पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील मैदानात खेळवण्यात येत आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर एक तास उशीरा सुरु झालेला सामना तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आला. पंजाबच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १०. १ षटकात १२२ धावा केल्या होत्या. फ्लड लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे सामना थांबवण्यात आल्याची माहिती पहिल्यांदा देण्यात आली. त्यानंतर सामना सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. नेमकं कारण काय ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण हा सामना थांबवण्यामागे भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत असावी, अशी माहिती समोर येत आहे.
पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्यच्या रुपात एकमेव विकेट गमावली होती. त्याने ३४ चेंडूत ६ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. त्याने २०५.८८ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. दुसऱ्या बाजूला प्रभसिमरन याने २८ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सकडून टी नटराजन याने एकमात्र विकेट घेतली.
Web Title: IPL 2025 PBKS vs DC The match between PBKS and DC has been temporarily halted due to a floodlight failure
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.