मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा बचाव करताना रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्ण शर्मावर डाव खेळला. पण त्यानंतर गुजरात टायटन्सच्या डावातील १० व्या षटकात प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेला अश्वनी कुमार (Ashwani Kumar) बॉलिंग करताना दिसला. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर आधीच झाल्यावर तो गोलंदाजीला कसा आला? असा प्रश्न क्रिकेट चाहत्याला पडू शकतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अचानक संधी मिळाली, अन् दुसऱ्याच षटकात सेट झालेली जोडी फोडली
मुंबई इंडियन्सच्या संघाने या युवा खेळाडूला कॉर्बिन बॉशच्या जागी कन्कशन सब्स्टीट्यूटच्या रुपात संधी देण्यात आली. बॅटिंग वेळी कॉर्बिन बॉश याच्या हेल्मेटवर जोरदार चेंडू आदळला होता. क्रिकेटच्या मैदानात अशी घटना घडल्यावर लाइक टू लाइकच्या रिप्लेसमेंटच्या रुपात दुसरा गडी घेता येतो. कॉर्बिन बॉश हा बॅटिंगशिवाय बॉलिंगही करतो. तो मैदानात नसल्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघाने अश्वनी कुमार याचा गोलंदाजाच्या रुपात वापर केला. हा डाव एकदम यशस्वी ठरला . कारण त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात सेट झालेली शुबमन गिल आणि बटलरची जोडी फोडली. गुजरातच्या डावातील १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आधी शुबमन गिलला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण तिलक वर्माने त्याचा झेल सोडला. पुढच्याच चेंडूवर स्ट्राइकवर आलेल्या जोस बटरलची विकेट घेत त्याने गुजरात टायटन्सच्या सघाला दुसरा धक्का दिला.
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
यंदाच्या हंगामात कन्कशन सबच्या रुपात मैदानात उतरणारा तो पहिलाच खेळाडू
पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई इंडियन्सच्या संघाची बॅटिंग गडबडली. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर कॉर्बिन बॉश याने उपयुक्त खेळी केली. त्याने २२ चेंडूत २७ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या डावातील २० व्या षटकात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला होता. त्यामुळेच कन्कशन सब्स्टीट्यूटच्या रुपात अश्वनी कुमार याची प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही अचानक मैदानात एन्ट्री झाली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील कन्कशन सबच्या रुपात मैदानात उतरणारा तो पहिला खेळाडूही ठरला.
सामनाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर होते खेळाडूची एन्ट्री
क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करतावेळी खेळाडूला डोक्याला मार बसला असेल तर विशेष खबरदारीसाठी कन्कशन सबचा नियम लागू केला जातो. मैदानात उतरु न शकणाऱ्या खेळाडूच्या जागी लाइक टू लाइक रिप्लेसमेंटच्या रुपात कन्कशन सबच्या रुपात एखाद्या खेळाडूला परवानगी देण्याचे अधिकार हे सामनाधिकाऱ्याकडे असतात.
Web Title: IPL 2025 MI vs GT Ashwani Kumar Has Came As Concussion Sub Of Corbin Bosch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.