मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यावेळी मुंबईतील वानखेडेच्या मैदानात एक खास नजारा पाहायला मिळाला. हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पहिल्यांदाच आयपीएलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या बहुमूल्य योगदानाला सलाम करण्यासाठी चाहत्यांनी वानखेडेवर रोहितच्या नावाची ४५ क्रमांकाची जर्सी घालून स्टेडियममध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय मुंबई इंडियन्सनेही रोहितचा खास आणि हटके अंदाजात सन्मान केला. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितचा खास सन्मान; चाहत्यांना मिळालं स्पेशल गिफ्ट
मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यातील दिग्गजाच्या सन्मानार्थ वानखेडेवरील चाहत्यांना खास जर्सी गिफ्ट स्वरुपात दिल्या. MI नं चाहत्यांना वाटलेली जर्सी ही निळ्या रंगाची आहे. जर्सीच्या मागच्या बाजूला रोहित अशा नावासह ४५ हा आकडा पांढऱ्या रंगात लिहिल्याचे दिसून येते. जर्सीच्या पुढच्या बाजूला ठळक अक्षरात 'मुंबईचा राजा' असं लिहिले आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सचा लोगोही त्यावर दिसून येतो. रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई इंडियन्सने लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरतीये.
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
...अन् कसोटीतून रोहित शर्मानं अचानक घेतली होती निवृत्ती
आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघात कुणाला संधी मिळणार? रोहितच कॅप्टन राहिल का? या चर्चा रंगत असताना रोहित शर्मानं ७ मे रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीनंही कसोटीतून टाटा बाय बाय केले. मुंबई इंडियन्स आधी मुंबई क्रिकेट असोसिशनकडूनकडून रोहित शर्माचा खास सन्मान करण्यात आला होता. वानखेडेच्या मैदानातील एका स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात आले आहे.
Web Title: IPL 2025 MI vs DC Mumbai Indians Distributing Mumbai Cha Raja Name Jerseys At Wankhede To Honour Their Legend Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.