Jitesh Sharma Hugged Rishab Pant After Save His Wicket Run Out : लखननौ सुपरजाएंट्सचा कर्णधार रिषभ पंत याने अखेरच्या सामन्यात आधी दमदार शतकासह अन् मग फिल्डिंगवेळी खिलाडूवृत्तीच दर्शन दाखवून देत अनेकांची मनं जिंकली. लखनौच्या इकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंट्सनं ठेवलेल्या २२८ धावांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यशस्वी पाठलाग केला. जितेश शर्मा हा RCB च्या विजयातील हिरो ठरला. या सामन्यात रिषभ पंतनं जितेश शर्माच्या विरोधात रनआउटची केलेली अपील रिषभ पंतनं मागे घेतल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडंल जाणून घेऊयात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् मग जितेशनं घेतली पंतची गळाभेट
पंतनं खिलाडूवृत्ती जपल्यावर RCB चा कार्यवाहू कर्णधार जितेश शर्मानं लगेच त्याची गळाभेट घेतल्याचे दृश्यही पाहायला मिळाले. मैदानात घडलेली ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतून समालोचन करणाऱ्या मंडळींनीही खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. मैदानातील पंत आणि जितेश यांच्यातील खास दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १७ व्या षटकात दिग्वेश राठी याच्या अखेरच्या चेंडूवर मयंक अग्रवाल स्ट्राइक वर होता. दिग्वेश रनअप घेऊन चेंडू फेकण्यासाठी आल्यावर नॉन स्ट्राइकवर असलेल्या जितेश शर्मानं क्रीज सोडले. दिग्वेशनं चलाकी दाखवत 'मंकडिंग'चा डाव खेळत जितेशला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा डाव खेळला. रीप्लेमध्ये जितेश क्रीज बाहेर असल्याचे दिसून आले. पण रिलिज पॉइंटचा विचार करून टेलिव्हिजन अंपायरने तो नॉट आउट असल्याचा निर्णय दिला. एका बाजूला हे सगळं घडतं असताना रिषभ पंतने संघाने केलेली अपील मागे घेतली होती. या घटनेनंतर जितेशनं पंतची गळाभेट घेत त्याची आभार मानल्याचे दिसून आले.
पंतच्या शतकावर भारी पडली जितेशची अर्धशतकी खेळी
पंतच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने धावफलकावर २२७ धावा लावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु समोर २२८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना विराट-फिल सॉल्ट जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली आउट झाल्यावर RCB मॅचमध्ये फसतीये की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण रजत पाटीदारच्या जागी कार्यवाहू कर्णधार झालेल्या जितेश शर्मानं आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.
Web Title: IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharma Hugged Rishab Pant After LSG Captain Withdraws Digvesh Rathi Run Out Appeal Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.