IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Set New Record With Player Of The Match Award : लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं बाजी मारली. अखेरच्या पाच षटकात फलंदाजीला येऊन धोनीनं संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय या मॅचमध्ये विकेटमागेही त्याने कमालीची कामगिरी करून दाखवली होती. परिणामी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. IPL स्पर्धेत ६ वर्षांनी तो 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार विजेता ठरला आहे. मॅच विनिंग कामगिरीसाठी मिळालेल्या पुरस्कारासह त्याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचलाआहे. एवढेच नाही तर धोनीने किंग कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी साधली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामनावीर पुरस्कार पटकवणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरला धोनी; किंग कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
महेंद्रसिंह धोनीने वयाच्या ४३ व्या वर्षी सामनावीर पुरस्कार पटकवत नवा इतिहास रचला आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो आयपीएलच्या आतपर्यंतच्या इतिहासातील सर्वात वयस्क खेळाडू आहे. यासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केलीये. धोनीने १८ व्या वेळी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. यासह त्याने कोहली आणि डेविड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. या दोघांनीही प्रत्येकी १८ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे. एबी डिव्हिलियर्स याने सर्वाधिक २५ वेळा तर ख्रिस गेलनं २२ वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकवलाय.
IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!
२१७५ दिवसांनी धोनी ठरला सामनावीर
या आधी २०१९ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनीला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. कमालीचा योगायोग हा की, त्यावेळी पंतच्या संघाविरुद्धच त्याने हा पुरस्कार पटकवला होता. फरक एवढाच की, त्यावेळी पंत कॅप्टन्सी करत नव्हता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १ मे २०१९ रोजी चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात धोनीने २२ चेंडूत ४४ धावांची दमदार खेळी केली होती. याशिवाय या मॅचमध्ये त्याने दोन स्टंपिंगसह एक कॅच घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
मॅन ऑफ द मॅच मी कसा ते.. नेमकं काय म्हणाला धोनी?
बऱ्याच वर्षांनी मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी धोनी पोडियमवर आल्यावर मुरली कार्तिक या आधी हा पुरस्कार कधी मिळाला होता ते आठवतंय का? असा प्रश्न विचारला होता. हे उत्तर धोनीला काही देता आले नाही. पण लखनौ विरुद्धच्या सामन्यानंतर सरप्राइज मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली. धोनी म्हणाला की, या मॅचमध्ये मला हा पुरस्कार का दिला तेच कळलं नाही. यावेळी त्याने उत्तम गोलंदाजी करणाऱ्या नूर अहमदचेही नाव घेतले.
Web Title: IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Becomes The Oldest Player In IPL History To Win The Player Of The Match Award Also Equal Virat Kohli And David Warner's Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.