IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

IPL 2025 Final RCB vs PBKS: सामना कुठे : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, किती वाजता : सायं. ७.३०

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 07:11 IST2025-06-03T07:09:37+5:302025-06-03T07:11:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Final RCB vs PBKS who will be the new champion strength weakness schedule | IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Final RCB vs PBKS: रोहित नाईक | लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदाबाद: आयपीएलचे १८ वे सत्र आणि किंग कोहलीची जर्सी क्रमांक १८ असे समीकरण जुळवून क्रिकेट चाहते पहिल्यांदाच विराट कोहलीला आयपीएल जेतेपद पटकावताना पाहण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, हे स्वप्न पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर सहजासहजी पूर्ण करून देणार नाही हे नक्की. मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यात जेव्हा बंगळुरू आणि पंजाब आमने-सामने येतील तेव्हा त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते दडपण झुगारण्याचे.

आजचा सामना खास का?

आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही हा झळाळता करंडक उंचावता आलेला नाही. त्यामुळे जो जिंकेल तो संघ प्रथम आयपीएल विजेता ठरेल.

बिनधास्त खेळा

श्रेयसने शानदार नेतृत्व करत पंजाबला अंतिम फेरी गाठून दिली. त्याने युवा खेळाडूंवर विश्वास ठेवून त्यांना दडपणाशिवाय खेळण्याची सूट दिली आहे.

मैं हूं ना?

कोहली बंगळुरू संघासाठी आधारस्तंभ ठरला आहे. यंदाचे सत्र हे कोहलीचेच असल्याचे चाहत्यांचे मत आहे. संघातील खेळाडूही कोहलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरतील.

मुंबईकराला पाठिंबा?

मुंबईचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर मुंबईकर खेळाडूनेच जेतेपद जिंकावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त करत पंजाबला पाठिंबा दर्शविला आहे.

पंजाबची ताकद

  • कर्णधार श्रेयस अय्यरचा जबरदस्त फॉर्म. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांचे कल्पक मार्गदर्शन.
  • नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस यांच्यामुळे मधली फळी भक्कम.
  • ३ युवा खेळाडूंचा बेधडक खेळ. अर्शदीप सिंगच्या नेतृत्वात गोलंदाजी समतोल.


कमजोरी

  • प्रियांश आर्य व प्रभसिमर सिंग यांच्याकडून अतिआक्रमकपणा होण्याचा धोका.
  • युझवेंद्र चहलकडून लौकिकास साजेशी कामगिरी होत नाही.
  • डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान.


बंगळुरूची ताकद

  • विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामीवीरांकडून वेगवान सुरुवात.
  • मधल्या फळीत टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड यांच्यामुळे फलंदाजी खोलवर.
  • हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्या रूपाने गोलंदाजी विभागात मोठा अनुभव. डेथ ओव्हर्समध्ये नियंत्रित मारा.


कमजोरी

  • आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
  • गोलंदाजांच्या कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव.
  • फिरकी गोलंदाजांपुढे धावांवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान.

Web Title: IPL 2025 Final RCB vs PBKS who will be the new champion strength weakness schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.