IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

Coronavirus, SRH Player Covid Positive, IPL 2025: हैदराबादचे कोच डॅनियल व्हेटोरीने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 18:38 IST2025-05-18T18:37:27+5:302025-05-18T18:38:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Big News Travis Head covid 19 positive will return india 19th may srh kavya maran headache | IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Coronavirus, SRH Player Covid Positive, IPL 2025: आयपीएलचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पण यादरम्यान एक धक्कादायक बातमी आली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या एका स्टार परदेशी खेळाडूला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तो वेळेवर भारतात येऊ शकला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी रविवारी खुलासा केला की संघाचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रेव्हिस हेडला ( Travis Head Covid-19 Positive) कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तो वेळेवर भारतात परतू शकलेला नाही आणि संघाच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही.

ट्रेव्हिस हेडला कोरोनाची लागण

भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL 2025 मध्येच थांबवण्यात आले होते. यामुळे सर्व परदेशी खेळाडू आपापल्या घरी परतले. ट्रेव्हिस हेड देखील त्याच्या देशात, ऑस्ट्रेलियाला परतला. स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर कर्णधार पॅट कमिन्स भारतात परतला, पण ट्रेव्हिस हेड परतला नाही. याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आता त्यामागील कारण सर्वांना कळले आहे. सनरायझर्सचा पुढील सामना सोमवारी १९ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी होईल, पण हेड त्यात सहभागी होऊ शकणार नाही.

SRH च्या प्रशिक्षकांनी दिली माहिती

सनरायझर्सचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला की ऑस्ट्रेलियामध्ये असताना हेडला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. यामुळे तो ताबडतोब भारतात परतू शकत नाही आणि आता सोमवारी सकाळीच येथे पोहोचेल, असे ते म्हणाले. यामुळे तो लखनौविरुद्ध खेळू शकणार नाही. तसेच तो पुढील सामन्यात खेळेल की नाही हे तपशीलवार चौकशीनंतरच ठरवले जाईल. हेडच्या अनुपस्थितीचा हैदराबादवर फारसा परिणाम होणार नाही. कारण संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही.

Web Title: IPL 2025 Big News Travis Head covid 19 positive will return india 19th may srh kavya maran headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.