तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले

आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:18 PM2024-04-22T21:18:50+5:302024-04-22T21:19:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : Nehal Wadhera ( 49), Tilak Verma ( 65 ); Sandeep Sharma take 5 wickets, MI set 180 runs target to RR  | तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले

तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live Marathi : आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी ५२ धावांत मुंबईचे ४ फलंदाज माघारी पाठवले होते. तिलक वर्मा व नेहाल या युवा डावखुऱ्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करताना RR ला बॅकफूटवर फेकले. राजस्थानच्या संदीप शर्माने जबरदस्त पुनरागमन करताना पाच विकेट्स घेतल्या. 


वानखेडे स्टेडियमनंतर RR ने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना संदीप शर्माने त्याच्या दोन षटकांत बाद करून मुंबईची अवस्था ३ बाद २० अशी केली. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणे अपेक्षित असताना MI ने मोहम्मद नबीला पाठवले. युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्या षटकात नबीला ( २३) कॉट अँड बोल्ड केले आणि  आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.  

युझवेंद्र चहलचा द्विशतकापर्यंतचा प्रवास

  • मेडन विकेट - मुरली विजय [२०१४]
  • २५ वी विकेट - संदीप शर्मा [२०१५]
  • ५०वी विकेट - काइल ऍबॉट [२०१६]
  • ७५वी विकेट - ग्लेन मॅक्सवेल [२०१८]
  • १००वी विकेट - युसूफ पठाण [२०१९]
  • १२५वी विकेट - शाहरुख खान [२०२१]
  • १५०वी विकेट - दुश्मंथा चमीरा [२०२२]
  • १७५वी विकेट - अंबाती रायुडू [२०२३]
  • २००वी विकेट - मोहम्मद नबी [२०२४]

 

चार विकेट्स पडूनही हार्दिक फलंदाजीला न येता नेहाल वढेराला पाठवले आणि यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना खेळणाऱ्या नेहालने दम दाखवला. त्याने तिलकसह पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नेहाल त्याच्या भात्यातील सर्व फटके खेचून मुंबईच्या धावांचा वेग वाढवला. तिलकने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. चहलच्या गोलंदाजीवर नेहालने दोन खणखणीत षटकार खेचले. पण, २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर त्याला बोल्टने माघारी पाठवले. नेहाल व तिलक यांनी  ५२ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी केली. बोल्टने ४ षटकांत ३२ धावांत २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या ( १०) स्वस्तात परतला.

 
तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. संदीप शर्माने २०व्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर तिलक व गेराल्ड कोएत्झी यांना माघारी पाठवले. संदीपने या षटकातील तिसरी विकेट घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या. मुंबईला ९ बाद १७९ धावाच करता आल्या.
 

 

Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : Nehal Wadhera ( 49), Tilak Verma ( 65 ); Sandeep Sharma take 5 wickets, MI set 180 runs target to RR 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.