IPL 2021 Suspended : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशात जाण्यासाठी घ्यावा लागतोय मालदिवचा आसरा, जाणून घ्या कारण

Australian players set for IPL exodus to the Maldives : आयपीएलच्या १४व्या पर्वातील ३० सामने झाले आहेत आणि उर्वरित ३० सामने आता केव्हा व कुठे होतील, याबाबत सर्वांची उत्सुकता आता ताणली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:27 PM2021-05-04T20:27:44+5:302021-05-04T20:28:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Suspended : Australian players set for IPL exodus to the Maldives, There are close to 40 Australians in the IPL bubble | IPL 2021 Suspended : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशात जाण्यासाठी घ्यावा लागतोय मालदिवचा आसरा, जाणून घ्या कारण

IPL 2021 Suspended : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशात जाण्यासाठी घ्यावा लागतोय मालदिवचा आसरा, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. सध्या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षित रवानगी कशी करायची, हा प्रश्न बीसीसीआय व खेळाडूंना पडला आहे. ऑस्ट्रेलियानं भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर १५ मे पर्यंत बंदी घातल्यामुळे त्यांना मायदेशात जाणेही अवघड झाले आहे. आयपीएलमध्ये खेळाडू, प्रशिक्षक स्टाफ आणि समालोचक असे जवळपास ४० ऑस्ट्रेलियन सदस्य आहेत आणि आता त्यांना मालदिवचा आसरा घ्यावा लागणार आहे. आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!

पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, रिकी पाँटिंगस सायमन कॅटिच आणि अन्य खेळाडू हेही समालोचक माईकल स्लॅटर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन मालदिवला जाण्याच्या तयारीत आहेत. मालदिव हे ऑस्ट्रेलियापासून जवळ आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतापेक्षी तिथे अधिक सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे किमान १५ मे पर्यंतची बंदी असेपर्यंत ते तिथे राहण्याचा विचार करू शकतात. डॅन ख्रिस्टियन मात्र या पर्याय नाही वापरणार कारण त्याला लंडनमध्ये तो भारतातच राहील.  आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!

कोणत्या संघात किती ऑसी खेळाडू?

  • चेन्नई सुपर किंग्स - जेसन बेहरनडॉर्फ, मायकेल हसी
  • दिल्ली कॅपिटल्स - स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, रिकी पाँटिंग, जेम्स होप्स
  • कोलकाता नाईट रायडर्स - पॅट कमिन्स, बेन कटिंग, डेव्हिड हसी
  • मुंबई इंडियन्स - नॅथन कोल्टर-नील, ख्रिस लिन
  • पंजाब किंग्स - मोईजेस हेन्रीक्स, झाय रिचर्डसन, रिलेय मेरेडिथ, डॅमिएन राईट
  • रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - ग्ले मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, डॅनिएल सॅम्स, सायमन कॅटिच, अॅडम ग्रिफीथ
  • सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, टॉम मुडी, ट्रेव्हर बायलिस, ब्रॅड हॅडीन

 

Web Title: IPL 2021 Suspended : Australian players set for IPL exodus to the Maldives, There are close to 40 Australians in the IPL bubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.