IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसनच्या ८२ धावांवर भारी पडला जेसन रॉय, SRHनं विजय मिळवत प्ले ऑफचं गणित बिघडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:59 PM2021-09-27T22:59:32+5:302021-09-27T23:00:51+5:30

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघानं आज सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) पराभूत केले.

IPL 2021, SRH vs RR Live Updates : Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 7 wickets, second win in this season | IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसनच्या ८२ धावांवर भारी पडला जेसन रॉय, SRHनं विजय मिळवत प्ले ऑफचं गणित बिघडवलं

IPL 2021, SRH vs RR Live Updates : संजू सॅमसनच्या ८२ धावांवर भारी पडला जेसन रॉय, SRHनं विजय मिळवत प्ले ऑफचं गणित बिघडवलं

Next

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघानं आज सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) पराभूत केले. डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेसन रॉयनं खणखणीत अर्धशतक झळकावून SRHच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या खेळीनं संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) ८२ धावा व्यर्थ गेल्या. हैदराबादनं IPL 2021मधील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या मनसुब्यांना धक्का दिला. RRनं हा सामना जिंकून टॉप फोअरमध्ये प्रवेश केला असता, परंतु आता इतरांचेही गणित बिघडले आहे.

संजू सॅमसनचं फॉर्मात येणं अनेकांच्या मनात धडकी भरवणारं आहे. विशेषतः ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ज्यांनी टीम इंडियात निवड झालीय, परंतु ते फॉर्माशी झगडत आहेत, त्यांच्यासाठी ही बाब चिंता वाढवणारी आहे. संजू सॅमसननं सलग दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली आणि आज तर त्यानं सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सॅमसन ५७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. राजस्थाननं ५ बाद १६४ धावा केल्या. लोम्रोर २९ धावा केल्या. अखेरच्या तीन षटकांत RRला केवळ १८ धावाच करता आल्या आणि ही बाब त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली, तर आश्चर्य वाटायला नको.

डेव्हिड वॉर्नरचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही आजच्या सामन्यातील सर्वात चर्चेची गोष्ट ठरली. वॉर्नर फॉर्माशी झगडतोय, परंतु त्याला बाकावर बसवलं जाईल याची कल्पनाही कुणी केली नसावी. त्याच्या जागी SRHकडून आज जेसन रॉयनं पदार्पण केलं. प्रथम फलंदाजीला आलेल्या RRचा एव्हिन लुईस दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. भुवनेश्वर कुमारनं त्याची विकेट घेतली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी संयमी खेळ करत विकेट टिकवली. राजस्थाननं ७ षटकांत १ बाद ५७ धावा केल्या. जैस्वालनं २३ चेंडूंत ३६ धावा केल्या. लिएम लिव्हिंगस्टोन ( ४) हा पुन्हा अपयशी ठरला. सिद्धार्थ कौलनं २०व्या षटकात दोन विकेट घेत SRHला कमबॅक करून दिले. 

प्रत्युत्तरात वृद्धीमान सहा व पदार्पणवीर जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी १०च्या सरासरीनं ५७ धावा जोडल्या. महिपाल लोम्रोरनं RRला पहिलं यश मिळवून दिलं, सहा १८ धावांवर यष्टीचीत झाला. जेसन रॉय व केन विलियम्सन ही जोडी SRHची धावगती कायम ठेवत विकेट राखून खेळत होती. त्यामुळे RRवरील दडपण वाढलेलं होतं. जेसन रॉयनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून झोकात पदार्पण केलं. यशस्वी जैस्वालनं त्याचा झेल सोडला, परंतु त्याची भरपाई चेतन सकारीयनं केली. त्यानं पुढील षटकात रॉयला स्लोव्हर चेंडूवर सॅमसनच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवलं. रॉयनं ४२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. 


पुढच्याच षटकात मुस्ताफिजूर रहमान यानं SRHच्या प्रियाम गर्गला भोपळ्यावर माघारी पाठवले. पण, केन संयमी खेळ करून RRच्या हातून सामना अलगद खेचून नेत होता. अखेरच्या पाच षटकांत SRHला ३४ धावा बनवायच्या होत्या. अभिषेक शर्मानं केनला उत्तम साथ देताना SRHला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. शर्मानं १६ चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या, तर केननं ४१ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. हैदराबादनं ९ चेंडू व ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

English summary :
First win for #SRH after 5 games in #IPL2021 - lead by Roy 60(42), cool calm composed Williamson 51*(41) and young Abhishek 21*(16) helped to chase down 165 runs against #RR.

Web Title: IPL 2021, SRH vs RR Live Updates : Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 7 wickets, second win in this season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app