ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates chennai : तिसऱ्या षटकात विकेट मिळवूनही रॉयल चॅलेंजरस् बंगलोर संघाला सामन्यावर पकड घेता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना RCBच्या हातून सामना खेचला. वॉर्नरनं या सामन्यात दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला. मंगळवारी KKRविरुद्ध रोहितनं केलेला विक्रम २४ तासांच्या आत वॉर्नरनं त्याच्या नावावर केला. IPL 2021 : SRH vs RCB  T20 Live Score Update

संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगलोर ( Royal Challengers Bangalore) च्या तगड्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. पाच वर्षानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावलं. विराट ( ३३) माघारी परतल्यानंतर ग्लेनसह ३८ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. होल्डरनं त्या षटकात १ धाव देत विकेट घेतली. SRH vs RCB, SRH vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news 

टी नटराजनला रिप्लेस करून SRH कर्णधार वॉर्नरनं राशिद खानला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलावलं. त्याची ही ट्रिक यशस्वी ठरली. एबी डिव्हिलियर्स १ धाव करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उभ्या असलेल्या वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विजय शंकर व मनीष पांडे यांनी अफलातून झेल टिपले. राशिदनं १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलनं ४१ चेंडूंत ५९ धावा केल्या ( ५ चौकार व ३ षटकार). आरसीबीला २० षटकांत ८ बाद १४९ धावा करता आल्या.  SRH vs RCB, SRH vs RCB live score, IPL 2021

वृद्धीमान सहाला पुन्हा एकदा अपयश आलं. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं SRHला पहिला धक्का दिला. सहा १ धावांवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पण, RCBला या संधीचा फायदा उचलता आला नाही. डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी सावध खेळ करताना SRHसाठी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी संयमानं खेळ केला.  विराट कोहलीचं हे वागणं बरं नव्हं, बाद झाला म्हणून रागात केली ही कृती

डेव्हिड वॉर्नरनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजां तिसरे स्थान पटकावले. विराट कोहली ५९४४ धावांसह अव्वल, तर सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या खात्यात ५२९४* धावा झाल्या असून त्यानं रोहित शर्मा ( ५२९२) व शिखर धवन ( ५२८२) यांना मागे टाकले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : David Warner is now the 3rd leading run-scorer in IPL history surpassing Rohit and Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.