IPL 2021 SRH pacer T Natarajan ruled out of the tournament due to knee injury | IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, संघाचा महत्वाचा गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, संघाचा महत्वाचा गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज टी. नटराजन याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (IPL 2021 SRH pacer T Natarajan ruled out of the tournament due to knee injury)

टी. नटराजन सनरायझर्स हैदराबाद संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. पण दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये तो संघाबाहेर होता. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी टी.नटराजन याला आराम दिल्याची माहिती याआधी दिली होती. त्याच्या जागी खलील अहमद याला खेळविण्यात आलं होतं. पण आता टी.नटराजनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यानं आयपीएल खेळू शकणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या यंदाच्या सीझनची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. संघाला सुरुवातीचे तीन सामने गमवावे लागले. त्यानंतर चौथ्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध विजय प्राप्त करुन संघाला खातं उघडता आलं आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 SRH pacer T Natarajan ruled out of the tournament due to knee injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.