IPL 2021 : RR vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरला न खेळवण्याची चूक महागात पडली, RRनं अगदी सहज SRHची जिरवली!

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : जॉस दी बॉस!, आज असंच म्हणावं लागेल. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज  धु धु धुतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:16 PM2021-05-02T19:16:24+5:302021-05-02T19:16:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : Removing David Warner proven even more disastrous for SRH, RR won by 55 runs | IPL 2021 : RR vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरला न खेळवण्याची चूक महागात पडली, RRनं अगदी सहज SRHची जिरवली!

IPL 2021 : RR vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरला न खेळवण्याची चूक महागात पडली, RRनं अगदी सहज SRHची जिरवली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021 t20 RR vs SRH live match score updates Delhi : जॉस दी बॉस!, आज असंच म्हणावं लागेल. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) जॉस बटलरनं ( Jos Buttler) सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला आज  धु धु धुतले. बटलरनं आयपीएलमध्ये पहिल्या शतकाची नोंद करताना कर्णधार संजू सॅमसनसह दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. डेव्हिड वॉर्नरसारखा स्फोटक फलंदाज बाकावर बसवून हैदराबादनं चूक केली आणि २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची उणीव जाणवली. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मनीष पांडेला सलामीला पाठवण्याचा डाव काही यशस्वी ठरला नाही. IPL 2021 :RR vs SRH T20 Live Score Update

इंग्लंडच्या खेळाडूची आयपीएलमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली,  केन विलियम्सननं सुरूवातीच्या षटकांत आदिल राशिदला गोलंदाजीसाठी आणले आणि त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला ( १२) पायचीत केलं. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर या जोडीनं SRHला रडवले.  संजूनं ३३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावांसह दुसऱ्या विकेटसाठी बटलरसह १५० धावांची भागीदारी केली. बटलरनं ५६ चेंडूंत शतक पूर्ण केलं आणि त्यात १० चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. बटलरचा झंझावात १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दुर्दैवीरित्या थांबला. त्यानं ६४ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह १२४ धावांची वादळी खेळी केली.  राजस्थाननं २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला. IPL 2021 RR vs SRH, RR vs SRH Live Match

प्रत्युत्तरात, हैदराबादनं मनीष पांडे व जॉनी बेअरस्टो ही नवी जोडी सलामीला उतरवली अन् दोघांनी चांगली सुरूवातही करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५७ धावा जोडल्या. मुस्ताफिजून रहमान यानं ही जोडी तोडली. फॉर्मात असलेल्या मनीषला त्यानं सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केलं. मनीषनं २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. पुढच्याच षटकात राहुल टेवाटियानं SRHचा दुसरा सलामीवीर बेअरस्टोला बाद केलं. बेअरस्टो २१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. RR vs SRH Live Score, IPL 2021 RR vs SRH, RR vs SRH Live Match


SRHनं पहिल्या १० षटकांत २ बाद ८२ धावा केल्या होत्या आणि त्यांना अखेरच्या ६० चेंडूंत १३९ धावांची गरज होती. ११व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर केन विलियम्सनचा झेल चेतन सकारियाकडून सुटला, परंतु पुढच्याच चेंडूवर विजय शंकर ( ८) झेलबाद झाला. कार्तिक त्यागीनं RRला मोठी विकेट मिळवून दिली, त्यानं SRHचा कर्णधार केन विलियम्सनला ( २०) धावांवर माघारी जावं लागलं. धावा व चेंडू यातील वाढत चाललेलं अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात SRHचे तळाचे फलंदाज विकेट गमावून बसले. ख्रिस मॉरीस व मुस्ताफिजूर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. SRHला ८ बाद १६५ धावा करता आल्या अन् RR नं ५५ धावांनी सामना जिंकला. RR vs SRH T20 Match, RR vs SRH Live Score, IPL 2021 RR vs SRH, RR vs SRH Live Match

Web Title: IPL 2021 :RR vs SRH  T20 Live Score Update : Removing David Warner proven even more disastrous for SRH, RR won by 55 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.