IPL 2021 : RR vs PBKS T20 : Fans On Twitter Hilariously Troll Krunal Pandya After Deepak Hooda’s Fiery Half-Century | IPL 2021 : RR vs PBKS T20 : दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा!

IPL 2021 : RR vs PBKS T20 : दीपक हुडानं २८ चेंडूंत कुटल्या ६४ धावा अन् कृणाल पांड्या होतोय ट्रोल; झाला होता मोठा राडा!

IPL 2021 : RR vs PBKS T20 : संजू सॅमसनच्या ११९ धावा आणि लोकेश राहुलच्या ९१ धावांची चर्चा असताना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या सामन्यात आणखी एका फलंदाजानं वादळी खेळी केली. दीपक हुडानं आयपीएल २०२१मधील सोमवारी झालेल्या सामन्यात २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या. दीपक हुडाच्या या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स कृणाल पांड्याच्या  ( Krunal Pandya) नावाचा उद्धार करत होते. त्यामागे एक मोठं भांडण कारण आहे.

दीपक ९.५व्या षटकात फलंदाजीला आला तेव्हा पंजाबच्या २ विकेट्स ८९ धावांवर पडल्या होत्या. दीपक मैदानावर उतरताच आक्रमक खेळ करायला लागला. त्यानं सहा षटकार व चार चौकारांची आतषबाजी करून ६४ धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीनं पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी केली. त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये २३हून कमी चेंडूंत दोन अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच अनकॅप खेळाडू ठरला. त्यानं

२०१५मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. विषेश म्हणजे त्यानं १२ एप्रिल २०१५ मध्ये जलद अर्धशतक झळकावले होते.

कृणाल पांड्या का होतोय ट्रोल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20  बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला होता. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली होती आणि त्यानं कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली होती. वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले. 

दीपकनं ४६ प्रथम श्रेणी, ६८ लिस्ट ए आणि १२३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. दीपक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. 

संजू सॅमसन एकटा भिडला, पंजाब किंग्सला पुरून उरला; पण, RRनं थोडक्यात सामना गमावला!

 पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या संजू सॅमसननं ( Sanju Samson) तुफान खेळ करताना PKBSच्या मनातील धाकधुक कायम राखली. जोस बटलर व शिवम दुबे यांच्यासोबत संजूनं RRच्या डावाला आकार दिला. रियान परागसह त्यानं १९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसननं आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानं ५४ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह हे शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राजस्थानला ७ बाद २१७ धावांवर समाधान मानावे लागले.  १२ व ३५ धावांवर असताना संजूला जीवदान मिळाले होते. संजू सॅमसन ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : RR vs PBKS T20 : Fans On Twitter Hilariously Troll Krunal Pandya After Deepak Hooda’s Fiery Half-Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.