IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं सलग दुसऱ्या पर्वात आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. पण, आता त्यांना क्वालिफायर १ चे स्वप्न पडत आहे आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ( DC) सामन्यातून स्वप्नपूर्ती करण्यासाठी ते प्रयत्नशील असलीत. मात्र, त्यांना त्यासाठी दिल्लीवर १६३+ धावांनी विजय मिळवावा लागेल आणि दिल्लीचा फॉर्म पाहता ते शक्य होईल, असे वाटत नाही. आयपीएलच्या इतिहासात १४६ धावांनी विजयाचा रेकॉर्ड आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाबरोबरच त्यांच्या क्वालिफायर १ खेळण्याच्या आशा मावळल्या.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्यात गतविजेत्यांनी मोठा उलटफेर न केल्यास RCBला एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावा लागेल. आजच्या सामन्याविषयी बोलायचं झाल्यास आर अश्विननं पाचवेळा एबी डिव्हिलियर्सची विकेट घेतली आहे, तर मॅक्सवेलनं दिल्लीच्या गोलंदाजाविरुद्ध ५७.५च्या सरासरीनं २००+ धावा केल्या आहेत. मॅक्सवेलला आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ४८ धावांची गरज आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
दिल्ली कॅपिटल्स ( DC) - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रिपाल पटेल, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अॅनरिच नॉर्ट्जे.
संबंधित बातमी