IPL 2021 : Rajasthan Royals Akash singh wants live ambani life & chetan sakariya wants to take ananya panday on date, Video  | IPL 2021: अनन्या पांडेसह डेटवर जायचंय राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूला; एकाला जगायचीय अंबानीची लाईफ, Video 

IPL 2021: अनन्या पांडेसह डेटवर जायचंय राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूला; एकाला जगायचीय अंबानीची लाईफ, Video 

Indian Premier League 2021 : आयपीलएलच्या १४व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या लढतीनं सर्वांची उत्कंठा वाढवली होती. अखेरच्या चेंडूपर्यंत RRचा कर्णधार संजू सॅमसन यानं झुंज दिली, परंतु पंजाब किंग्सला ४ धावांनी विजय मिळवण्यात यश आलं. क्रिकेटच्या मैदानापलीकडे आयपीएल चाहत्यांसाठी मनोरंजनाचा खजीनाही घेऊन येतो. त्यामुळेच आपापल्या फॅन्ससोबत कनेक्ट राहण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी प्रयत्न करताना दिसते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फॅन्सना इंटरनेट करतात. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात युवा गोलंदाज आकाश सिंग ( Akash Singh) आणि चेतन सकारिया ( Chetan Sakariya) हे रॅपिड फायर राऊंड खेळताना दिसत आहेत.  Video : महेंद्रसिंग धोनी/विराट कोहली स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठे समजतात का?; राहुल द्रविडच्या उत्तरानं केली बोलती बंद

या व्हिडीओत आकाश सिंगला उद्योगपती अंबानीसारखं आयुष्य जगायचं आहे, तर चेतनला एक दिवस अभिनेत्री अनन्या पांडे ( Ananya Pandey) हिच्यासह डेटवर जायचे आहे. आकाश व चेतन ही दोघंही डावखुरी गोलंदाज आहेत. राजस्थानच्या आकाशनं २०२० च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रवेश करणाऱ्या टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. सौराष्ट्रच्या चेतननं पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.   ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी

पाहा व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : Rajasthan Royals Akash singh wants live ambani life & chetan sakariya wants to take ananya panday on date, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.