IPL 2021, PBKS Vs RCB : हरप्रीत ब्रार... हे नाव लक्षात ठेवा; RCBच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल!

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) शुक्रवारी पंजाब किंग्सकडून ( Punjab Kings) ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात संधी मिळालेल्या २५ वर्षीय हरप्रीत ब्रारनं ( Harpreet Brar) संधीचं सोनं केलं. त्यानं २५ धावा केल्या अन् ४ षटकांत १९ धावा देत ३ विकेट्सही घेतल्या.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 07:15 AM2021-05-01T07:15:00+5:302021-05-01T07:15:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, PBKS Vs RCB : Match 26– 10 Best memes from PBKS vs RCB game | IPL 2021, PBKS Vs RCB : हरप्रीत ब्रार... हे नाव लक्षात ठेवा; RCBच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल!

IPL 2021, PBKS Vs RCB : हरप्रीत ब्रार... हे नाव लक्षात ठेवा; RCBच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मयांक अग्रवालचे अनफिट असणे हा सामन्याआधी पंजाब किंग्ससाठी मोठा धक्का होता. पण, लोकेश राहुल व ख्रिस गेल या अनुभवी फलंदाजांनी त्यांची जबाबदारी ओळखली. गेल व लोकेश यांच्या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूंत ८० धावांची भागीदारी करून पंजाब किंग्सचा पाया मजबूत केला. कर्णधार लोकेश राहुलनं संयमी खेळ करताना एक बाजू लावून धरली अन् ५७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं नाबाद ९१ धावांची खेळी केली. त्याच्या साथीला हरप्रीत ब्रार सप्राईज पॅकेज ठरला. त्यानं १७ चेंडूंत २५ धावा करताना लोकेशसह ३२ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. पंजाब किंग्सनं ५ बाद १७९ धावा केल्या. ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर!

प्रत्युत्तरात, देवदत्त पडीक्कलनं खणखणीत षटकार मारून इरादे स्पष्ट केले, परंतु रिली मेरेडीथ यानं त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या हरप्रीत ब्रारनं कमाल केली. ब्रारनं ११व्या षटकात सलग दोन चेंडूंत विराट ( ३५) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना बाद केले. RCBसाठी हे धक्के कमी होते की काय, ब्रारनं पुढील षटकात एबी डिव्हिलियर्सचा ( ३) अडथळा सहज दूर केला. ब्रारनं ४ षटकांत १ निर्धाव षटक १९ धावा अन् ३ विकेट्स घेतल्या. या धक्क्यानंतर RCBला सावरणे अवघड झाले.RCBला ८ बाद १४५ धावांवर समाधान मानावे लागले.  पंजाबनं हा सामना ३४ धावांनी जिंकला. '६ प्रौढ व ४ मुलांना झालाय कोरोना'; आर अश्विनच्या पत्नीनं कुटूंबाच्या कोरोनासोबतच्या संघर्षाचे दिले अपडेट्स

पाहा भन्नाट मीम्स

 

Web Title: IPL 2021, PBKS Vs RCB : Match 26– 10 Best memes from PBKS vs RCB game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.