IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर!

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ पुन्हा आपल्या मुळ स्वभावात आलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:36 PM2021-04-30T23:36:16+5:302021-04-30T23:36:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : Excellent bowling performance by Punjab Kings, disappointing batting performance by RCB | IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर!

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ पुन्हा आपल्या मुळ स्वभावात आलेला पाहायला मिळत आहे. देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे फॉर्मात असलेले फलंदाज असताना १८० धावांचे आव्हान म्हणजे काहीच नाही. पण, आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या २५ वर्षीय हरप्रीत ब्रारनं ( Harpreet Brar) संधीचं सोनं केलं. त्याच्या ७ चेंडूंनी सामनाच फिरवला. विराट, मॅक्सवेल व एबी हे जगातील तीन स्टार फलंदाज हरप्रीतच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले अन् पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) विजयाचा मार्ग सोपा झाला. 

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights :

  • मयांक अग्रवालचे अनफिट असणे हा सामन्याआधी पंजाब किंग्ससाठी मोठा धक्का होता. पण, लोकेश राहुल व ख्रिस गेल या अनुभवी फलंदाजांनी त्यांची जबाबदारी ओळखली. गेलनं RCBच्या कायले जेमिन्सनच्या एका षटकात पाच खणखणीत चौकार खेचून त्याचा इरादा स्पष्ट केला.
  • गेल व लोकेश यांच्या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूंत ८० धावांची भागीदारी करून पंजाब किंग्सचा पाया मजबूत केला. पण, गेल माघारी परतला अन् निकोलस, दीपक हुडा व शाहरूख खान यांना आलेल्या अपयशामुळे पंजाब १५० धावा करेल की नाही अशी चिंता सतावू लागली.
  • कर्णधार लोकेश राहुलनं संयमी खेळ करताना एक बाजू लावून धरली अन् ५७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं नाबाद ९१ धावांची खेळी केली. त्याच्या साथीला हरप्रीत ब्रार सप्राईज पॅकेज ठरला. त्यानं १७ चेंडूंत २५ धावा करताना लोकेशसह ३२ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. याच धावा RCBची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. पंजाब किंग्सनं ५ बाद १७९ धावा केल्या
  • प्रत्युत्तरात, देवदत्त पडीक्कलनं खणखणीत षटकार मारून इरादे स्पष्ट केले, परंतु रिली मेरेडीथ यानं त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या हरप्रीत ब्रारनं कमाल केली. 
  • ब्रारनं ११व्या षटकात सलग दोन चेंडूंत विराट ( ३५) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना बाद केले. RCBसाठी हे धक्के कमी होते की काय, ब्रारनं पुढील षटकात एबी डिव्हिलियर्सचा ( ३) अडथळा सहज दूर केला. ब्रारनं ४ षटकांत १ निर्धाव षटक १९ धावा अन् ३ विकेट्स घेतल्या. 
  • या धक्क्यानंतर RCBला सावरणे अवघड झाले.RCBला ८ बाद १४५ धावांवर समाधान मानावे लागले. रवी बिश्नोईनंही ४ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल १३ धावांत ३१ ( ३ चौकार व २ षटकार) धावांवर बाद झाला. बिश्नोईनं त्याचा अफलातून झेल टिपला.   पंजाबनं हा सामना ३४ धावांनी जिंकून प्ले ऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. 
     

Web Title: IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : Excellent bowling performance by Punjab Kings, disappointing batting performance by RCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.