IPL 2021 mumbai indians tops in all out oppositions in ipl | IPL 2021: नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'

IPL 2021: नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'

आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्सच्या (MI) संघाला तोड नाही यात शंका नाही. शनिवारीसुध्दा सनरायझर्सविरुध्द (SRH)  फक्त दीडशे धावांचे लक्ष्य देखील त्यांनी यशस्वीरित्या रक्षण करून यावर शिक्कामोर्तब केले.  नवव्या षटकात एक बाद 71 अशा भक्कम स्थिती असतानाही त्यांनी सनरायझर्सचा डाव दोन चेंडू शिल्लक असतानाच १३७ धावांत गुंडाळला. अखेरच्या पाच विकेट तर फक्त १३ चेंडू आणि फक्त आठ धावांच्या अंतरात काढल्या. 

On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा डाव गुंडाळण्यात इतरांपेक्षा आपली असलेली आघाडी मुंबई इंडियन्सनं अधिकच वाढवली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तब्बल २९ वेळा प्रतिस्पर्धी संघाला 'ऑल आउट' केलं आहे. आयपीएलमधील इतर कोणत्याही संघ 20 पेक्षा अधिक वेळा ही कामगिरी करू शकलेला नाही.  दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 20 वेळा प्रतिस्पर्धी संघाला 'ऑल आउट' केलं आहे. 

आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा डाव सर्वाधिक वेळा संपविणारे संघ असे... 

29- मुंबई इंडियन्स
20- चेन्नई सुपर किंग्ज
17- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
15- राजस्थान रॉयल्स
15- पंजाब किंग्ज
14- सनरायझर्स हैदराबाद
13- दिल्ली कॅपिटल्स

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 mumbai indians tops in all out oppositions in ipl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.