IPL 2021 : वानखेडे स्टेडियममध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; आतापर्यंत २९ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Indian Premier League 2021 : मुंबईतील आयपीएल ( IPL 2021) सामन्यांच्या मार्गातील अडथळे दूर होत आहेत, असे वाटत असताना रोज नवं संकट समोर उभं राहताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:03 PM2021-04-06T14:03:48+5:302021-04-06T14:04:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: More trouble for BCCI, 2 more groundstaff and one plumber test Covid-19 positive at Wankhede   | IPL 2021 : वानखेडे स्टेडियममध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; आतापर्यंत २९ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2021 : वानखेडे स्टेडियममध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; आतापर्यंत २९ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : मुंबईतील आयपीएल ( IPL 2021) सामन्यांच्या मार्गातील अडथळे दूर होत आहेत, असे वाटत असताना रोज नवं संकट समोर उभं राहताना दिसत आहेत. नितीश राणा, अक्षर पटेल, वानखेडे स्टेडियमवरील कर्मचारी, ब्रॉडकास्ट टीममधील १४ सदस्य अशी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मंगळवारी वानखेडे स्टेडिमयवरील दोन ग्राऊंड्समन आणि एक प्लम्बर अशी आणखी तीघं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. ( 2 more groundstaff and one plumber test Covid-19 positive ) IPL 2021 : आयपीएल फ्रँचायझींसाठी नसेल नाईट कर्फ्यू; महाराष्ट्र सरकारनं दिली सूट!

''दोन ग्राऊंड्समन आणि एक प्लम्बर अशी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. यापूर्वी १० ग्राऊंड स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता,''असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले. वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये क्लब हाऊस आहेत आणि सर्व ग्राऊंड्समनना तिथेच राहण्यास सांगितले आहे. मागील आठवड्यात वानखेडे स्टेडियमवरील काही सदस्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला खुणावतायेत तीन मोठे विक्रम; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चे पराक्रम!

दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ( Delhi Capitals, Chennai Super Kings, Punjab Kings आणि Rajasthan Royals) या चार संघाचे कॅम्प मुंबईत आहेत. IPL 2021 : KKRच्या शुबमन गिलनं दाखवला ट्रेलर; SRH विरुद्धच्या सामन्यापूर्वी ३५ चेंडूंत कुटल्या ७६ धावा

मुंबईतील फ्रँचायझींना रात्री ८ वाजत्यानंतर सराव करण्याची परवानगी
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians Vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्यानं ९ एप्रिलला आयपीएल २०२१ला सुरुवात होणार आहे. पण, मुंबईत १० एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. ''सामन्याची वेळ लक्षात घेऊन संघ CCI व MCA येथे दोन सत्रात सराव करत आहेत. सायंकाळी ४ ते ६.३० आणि ७.३० ते १० अशा या दोन सत्रांत खेळाडू सराव करणार आहेत,''असे आप्तकालीन विभागाचे सचिव श्रीरंग घोलप यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.  IPL 2021 : कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन

''त्यामुळे रात्री ८ वाजल्यानंतर संघ व आयपीएल स्टाफना मैदानावर सराव करण्याची संधी देत आहोत. मैदान ते हॉटेल अशा प्रवासाचीही त्यांना परवानगी दिली जात आहे. त्यांनी बायो बबल व अन्य नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहेत,''असे त्या पत्रात नमूद केले आहे.
 

Web Title: IPL 2021: More trouble for BCCI, 2 more groundstaff and one plumber test Covid-19 positive at Wankhede  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.