IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल!

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरची गेम चेंजिंग गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:29 PM2021-04-17T23:29:46+5:302021-04-17T23:30:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight  : Mumbai Indians are now the table toppers, they beat SRH by 13 runs  | IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल!

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरचा 'कहर', हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् मुंबई इंडियन्स अव्वल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : मुंबई इंडियन्सनं पुन्हा एकदा आयपीएलमधील ते राजे का आहेत, हे सिद्ध केलं. त्यांनी सलग दुसऱ्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. राहुल चहरची गेम चेंजिंग गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली.  मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ १३७ धावांत माघारी परतला. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले. राहुल चहर व ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.  बाबो!; जॉनी बेअरस्टोनं असा SIX मारला की फ्रिजच्या काचा फुटल्या, Video

IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight   

  • नाणेफेकिचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूनं लागताच रोहित शर्मानं फलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएल २०२१ प्रथमच एखाद्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी MIला दमदार सुरूवात करून दिली.
  • या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ५५ धावा कुटल्या. आतापर्यंत दोन सामन्यांत साजेशी कामगिरी करू न शकलेल्या विजय शंकरनं सामना फिरवला. त्यानं रोहित शर्मा ( ३२) व सूर्यकुमार यादव ( १०) यांना सलग दोन षटकांत माघारी पाठवले आणि MIची धावगती मंदावली
  • क्विंटन डी कॉक खिंड लढवत होता, परंतु राशिद खान व मुजीब उर रहमान यांच्या फिरकीचा सामना करताना तोही चाचपडला. त्यामुळे त्याच्यावरील दडपण वाढले आणि चुकीचा फटका मारून तोही माघारी परतला. इशान किशन व हार्दिक पांड्याही अपयशी ठरले.
  • किरॉन पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी पॉझिटिव्ह ठरला. त्यानं अखेरपर्यंत संयमानं खेळ करताना जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. आयपीएल २०२१मधील सर्वात लांब १०५ मीटरचा उत्तुंग षटकार त्यानं खेचला. त्याच्या ३५ धावांनी MIला १५० धावांचा पल्ला गाठून दिला.
  • मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर - जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला धडाकेबाज सुरूवात करून दिली. बेअरस्टोनं पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. वॉर्नर-बेअरस्टो यांनी MIच्या क्षेत्ररक्षकांच्या चुकींचा फायदा घेतला व ६७ धावांची सलामी दिली.
  • राहुल चहर व कृणाल पांड्या यांनी MIला मोक्याच्या क्षणी यश मिळवून देताना मनीष पांडे व बेअरस्टोला बाद केले. वॉर्नर एक बाजूनं खिंड लढवत होता, परंतु एका धावेचा मोह त्याला आवरला नाही आणि हार्दिक पांड्याच्या डायरेक्ट हिटवर तो धावबाद झाला. तिथे SRH वर दडपण निर्माण झालेलं पाहायला मिळालं.

Alert, quick and accurate! 👌👌 Here's how Hardik Pandya pulled off a stunning run-out to dismiss David Warner 🎥👇 #VIVOIPL #MIvSRH vivo Mumbai Indians

Posted by IPL - Indian Premier League on Saturday, April 17, 2021

  • केन विलियम्सची उणीव आजच्या सामन्यातही जाणवली. विराट सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु त्यानंही मोक्याच्या क्षणी मान टाकली, राहुल चहरनं त्याला बाद केलं. अभिषेक शर्माही त्याच षटकात माघारी परतला. जॉनी बेअरस्टो सलामीला आल्यानं SRHच्या मधल्या फळीवर दडपण निर्माण झालेलं दिसलं.
  • विजय शंकरनं १६व्या षटकात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकारांसह १६ धावा काढून SRHवरील दडपण किंचितसं कमी केलं. जसप्रीत बुमरानं टाकलेल्या १७व्या षटकात विजय शंकर झेलबाद होता, परंतु MI कडे DRS नसल्यानं त्याला जीवदान मिळालं. क्विंटन डी कॉकनं झेल टिपला होता, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद दिले. 
  • ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर  हार्दिकच्या आणखी एका डायरेक्ट हिटनं अब्दुल समदला ( ७) धावबाद केलं अन् SRHच्या ताफ्यात पुन्हा स्मशान शांतता पसरली. अखेरच्या चेंडूवर बोल्टनं अप्रतिम यॉर्कर टाकून आदिल राशिदला माघारी जाण्यास भाग पाडले. 
  • अखेरच्या चार षटकांत ३१ धावांची गरज अन् MIच्या गोलंदाजांची कामगिरी

१७ वे षटक- जसप्रीत बुमराह ( ४ धावा)
१८ वे षटक- ट्रेंट बोल्ट ( ६ धावा व २ विकेट्स)
१९ वे षटक - जसप्रीत बुमराह ( ५ धावा  व १ विकेट्स)
२०वे षटक - जसप्रीत बुमराह ( २ धावा व २ विकेट्स) 
 

Web Title: IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight  : Mumbai Indians are now the table toppers, they beat SRH by 13 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.