IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सचा आणखी एक रोमहर्षक विजय, सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक!

ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:10 PM2021-04-17T23:10:44+5:302021-04-17T23:13:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Mumbai Indians won by 13 runs, For the fist time SRH lost three matches (first three) in a row | IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सचा आणखी एक रोमहर्षक विजय, सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक!

IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सचा आणखी एक रोमहर्षक विजय, सनरायझर्स हैदराबादची पराभवाची हॅटट्रिक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) सलग दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्यानं SRHची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानं ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली. राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. चांगली सुरुवात करूनही हैदराबादनं पुन्हा शरणागती पत्करली.  मुंबई इंडियन्सनं हा सामना १३ धावांनी जिंकला.IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update   बाबो!; जॉनी बेअरस्टोनं असा SIX मारला की फ्रिजच्या काचा फुटल्या, Video 

डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांची सॉलिड सुरूवात...
मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर - जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला धडाकेबाज सुरूवात करून दिली. बेअरस्टोनं पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानं ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात तीन खणखणीत चौकार व एक अफलातून षटकार खेचला. त्याचा हा षटकार एवढा भारी होता की डगआऊटमधील फ्रिजच्या काचा तुटल्या. ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेअरस्टो हिट विकेट झाला. त्यानं २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ४३ धावा कुटल्या. त्यानंतर आलेला मनीष पांडे ( २) काहीच कमाल न करता माघारी फिरला. ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai


राहुल चहरनं सामन्यात निर्माण केली चुरस 
१२व्या षटकात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात वॉर्नर धावबाद झाला. हार्दिक पांड्याच्या डायरेक्ट हिटवर तो ३७ धावांवर बाद झाला. १ बाद ६७ असा धावसंख्येवरून ३ बाद ९० अशा अवस्थेत SRH सापडले. वॉर्नर बाद झाला तेव्हा SRHला ५१ चेंडूंत ६० धावांची गरज होती. केन विलियम्सची उणीव आजच्या सामन्यातही जाणवली. विराट सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु त्यानंही मोक्याच्या क्षणी मान टाकली, राहुल चहरनं त्याला बाद केलं. त्याच षटकात अभिषेक शर्माचा झेल फाईन लेगला रोहित शर्माकडून सुटला. पण, पुढच्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टनं सीमारेषेनजीक अभिषेक ( २) झेलबाद झाला. राहुल चहरनं ४ षटकांत १९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. ( Rahul Chahar the game changer- 3/19 (4))  MI vs SRH IPL Matches, MI vs SRH IPL match 2021


विजय शंकरनं SRHवरील दडपण काहीसं कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानं कृणाल पांड्याच्या षटकात सलग दोन षटकार खेचले. SRHला २४ चेंडूंत ३१ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात पाच विकेट्स होत्या. जसप्रीत बुमरानं टाकलेल्या १७व्या षटकात विजय शंकर झेलबाद होता, परंतु MI कडे DRS नसल्यानं त्याला जीवदान मिळालं. क्विंटन डी कॉकनं झेल टिपला होता, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद दिले. बुमरानं त्या षटकात फक्त चार धावा दिल्या. हार्दिकच्या आणखी एका डायरेक्ट हिटनं अब्दुल समदला ( ७) धावबाद केलं अन् SRHच्या ताफ्यात पुन्हा स्मशान शांतता पसरली. अखेरच्या चेंडूवर बोल्टनं अप्रतिम यॉर्कर टाकून आदिल राशिदला माघारी जाण्यास भाग पाडले. हैदराबादची अखेरची होप विजय शंकरही ( २८) माघारी परतला अन् त्यांचा पराभव पक्का झाला. हैदराबादला २० षटकांत १० बाद १३७ धावा करता आल्या. 

 


विजय शंकरनं दोन षटकांत सामना फिरवला अन् किरॉन पोलार्डनं दोन चेंडूंत इतिहास रचला
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. विजय शंकरनं ( Vijay Shankar) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत SRHला सामन्यात कमबॅक करून दिले, परंतु किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अखेरपर्यंत खिंड लढवली. IPL 2021 MI vs SRH, MI vs SRH Live Match

पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकनं दोन सुरेख चौकार मारून MIला सकारात्मक सुरुवात करून दिली. विजय शंकरनं  रोहित ( ३२) आणि  सूर्यकुमार यादव ( १०) यांना बाद केले. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. पण  पोलार्डनं २२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३५ धावा करताना मुंबईला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा पोलार्ड हा सहावा खेळाडूस तर तिसरा परदेशी खेळाडू ठरला. विजय शंकरनं ३ षटकांत १९ धावांत २ विकेट्स घेतल्या.  MI vs SRH T20 Match, MI vs SRH Live Score
 

Web Title: IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Mumbai Indians won by 13 runs, For the fist time SRH lost three matches (first three) in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.