IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Kieron Pollard with a monstrous 105 metre 6, biggest six of IPL 2021, Video | IPL 2021, MI vs SRH T20 Live : किरॉन पोलार्डचा मॉन्स्टर SIX पाहिलात का?; आयपीएल २०२१मधील सर्वात उत्तुंग षटकार, Video

IPL 2021, MI vs SRH T20 Live : किरॉन पोलार्डचा मॉन्स्टर SIX पाहिलात का?; आयपीएल २०२१मधील सर्वात उत्तुंग षटकार, Video

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. विजय शंकरनं ( Vijay Shankar) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत SRHला सामन्यात कमबॅक करून दिले, परंतु किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अखेरपर्यंत खिंड लढवताना मुंबई इंडियन्सला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली.   IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update 

पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकनं दोन सुरेख चौकार मारून MIला सकारात्मक सुरुवात करून दिली. विजय शंकरनं  रोहित ( ३२) आणि  सूर्यकुमार यादव ( १०) यांना बाद केले. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. पण  पोलार्डनं २२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३५ धावा करताना मुंबईला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. 

सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. ख्रिस गेल - ३५१
  2. एबी डिव्हिलियर्स - २३७
  3. रोहित शर्मा - २१७
  4. महेंद्रसिंग धोनी - २१६
  5. किरॉन पोलार्ड - २०१
  6. विराट कोहली - २०१ 

 

आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा पोलार्ड हा सहावा खेळाडूस तर तिसरा परदेशी खेळाडू ठरला.  त्यानं १५० डावांत २०० षटकार खेचले. गेलनं ६८, तर एबीनं १३७ डावांत २०० षटकार मारण्याचा पराक्रम केला.  

मुजीबनं टाकलेल्या १७व्या षटकात पोलार्डनं मॉन्स्टर सिक्स मारला...


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Kieron Pollard with a monstrous 105 metre 6, biggest six of IPL 2021, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.