IPL 2021 : MI vs RCB T20 Live : 'RCB ready for WrestleMania': Yuzvendra Chahal, Kyle Jamieson imitate The Undertaker's iconic slow walk - video  | IPL 2021 : MI vs RCB T20 Live : क्रिकेटसाठी नव्हे तर WWE साठी RCB सज्ज; विराट कोहलीच्या संघातील ‘अंडरटेकर’ पाहिला का?

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : क्रिकेटसाठी नव्हे तर WWE साठी RCB सज्ज; विराट कोहलीच्या संघातील ‘अंडरटेकर’ पाहिला का?

मुंबई : IPL 2021: MI vs RCB T20 Live  - संपूर्ण क्रिकेटविश्व आयपीएलसाठी सज्ज झालेले असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघामध्ये मात्र वेगळेच वातावरण पाहण्यास मिळाले. एकीकडे, आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना दुसरीकडे, आरसीबीमध्ये उत्सुकता लागली आहे ती डब्ल्यूडब्ल्यूई रेसलमेनिया फाईटची. आरसीबीचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरलही होत आहे.

 यामध्ये युझीने दिग्गज फायटर अंडरटेकरच्या म्युझिकवर त्याच्यासारखीच धमाकेदार एन्ट्री मारली असून त्याला साथ दिली आहे ती न्यूझीलंडचा अष्टपैलू कायल जेमिसन याने. त्यामुळे सध्या युझीला सगळेजण ‘आरसीबीचा अंडरटेकर’ असे म्हणत आहेत.हा व्हिडिओ पोस्ट करत युझीने कॅप्शन लिहिले आहे की, ‘चॅलेंजर्स रेसलमेनियासाठी सज्ज झाले आहेत.’ खरं म्हणजे काही तासांनीच डब्ल्यूडब्ल्यूईचा सर्वात फेमस इव्हेंट रेसलमेनिया आयोजित होणार आहे. १० आणि ११ एप्रिल होणाºया या शानदार फाईटची उत्सुकता भारतीयांमध्येही पाहण्यास मिळत आहे. त्यात युझीच्या या हटके व्हिडिओने या फाईटची रंगत आणखी वाढली आहे. भारतीयांमध्ये असलेली डब्ल्यूडब्ल्यूईची क्रेझ ओळखूनच युझीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आला रे आला...; मुंबई इंडियन्सचा नादच खुळा, RCBला टक्कर देण्यासाठी संघ रवाना, Video

युझी डब्ल्यूडब्ल्यूईचा खूप मोठा फॅन असून तो सुरुवापासूनच अंडरटेकरचा समर्थक राहिला आहे. गेल्याच वर्षी अंडरटेकरने रिटायरमेंट घेतली. या व्हिडिओमध्ये युझीने अंडरटेकरच्या स्टाईलमध्ये चालत येत एन्ट्री मारली असून त्याच्या मागे मागे त्याचा मॅनेजर म्हणून जेमिनस चालताना दिसतोय. फक्त बॉडी आणि हाईटमध्ये मार खाल्ल्याने नेटिझन्सनी यावेळी युझीला ट्रोल करण्याची संधीही सोडलेली नाही. त्याचवेळी, युझीच्या क्रिएटिव्हीटीला अनेकांनी दादही दिली आहे. क्विंटन डी कॉक नाही खेळणार; नव्या भीडूसह मुंबई इंडियन्स तगडी Playing XI मैदानावर उतरवणार!

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : MI vs RCB T20 Live : 'RCB ready for WrestleMania': Yuzvendra Chahal, Kyle Jamieson imitate The Undertaker's iconic slow walk - video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.