IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:43 PM2021-04-09T20:43:35+5:302021-04-09T20:45:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Washington Sundar strikes in the first over, took the wicket of Chris Lynn for 49.  | IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : वॉशिंग्टन सुंदर १३व्या षटकात गोलंदाजीला आला अन् अप्रतिम झेल घेत MIला धक्का दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Mumbai Indians Captain Rohit Sharma) यालाही प्रथम क्षेत्ररक्षण करायचे होते. पण, नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) बाजूनं लागला. विराटनं मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना गोलंदाजीत सातत्यानं प्रयोग करताना MIच्या धावगतीवर वेसण घातलं होतं. सूर्यकुमार यादव व ख्रिस लीन यांनी मुंबईचं दडपण कमी केलं, परंतु ते मागोमाग माघारी परतले. १३व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनं अप्रतिम झेल घेत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला. IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai

रोहितची विकेट आयती भेटली!
रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. आयपीएलमध्ये MIकडून पदार्पण करणारा लीन RCBच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना पाहायला मिळाला. रोहितनं या सामन्यात पहिला चौकार व पहिला षटकार मारण्याचा मान पटकावला. १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रोहितनं षटकार खेचला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला.  IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update

आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३६ वेळा धावबाद झाला आहे. यापैकी ११वेळा तो स्वतःच्या चुकीनं, तर २५ वेळा सहकाऱ्याच्या चुकीनं तंबूत परतला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावबाद होण्याचा नकोसा विक्रम रोहितच्या नावावर आहे. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news

सूर्यकुमार यादव येताच सामन्याचं चित्र बदललं..
रोहित माघीर परतल्यानंतर रिलॅक्स झालेल्या RCBला सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) फटकेबाजीचा सामना करावा लागला. सूर्याचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर ख्रिस लीननंही गिअर चेंज केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सनं पहिल्या १० षटकांत १ बाद ८६ धावा केल्या होत्या. पण, ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर RCBचा १५ कोटींचा गोलंदाज कायले जेमिन्सननं ( Kyle Jamieson) याच्या गोलंदाजीवर सूर्या ( ३१ धावा, ४ चौकार व १ षटकार) यष्टिरक्षक एबी डिव्हिलियर्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. MI vs RCB Live Score, IPL 2021 MI vs RCB, MI vs RCB Live match

१३व्या षटकात वॉशिंग्टन सूंदरला दिली पहिली ओव्हर
पॉवर प्लेमध्ये सर्वात इकॉनॉमी गोलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सूंदरला १३व्या षटकात विराटनं गोलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानं पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर स्वतःच्याच गोलंदाजीवर परतीचा सुरेख झेल टिपला. लीन ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ४९ धावांवर माघारी परतला. 

Web Title: IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Washington Sundar strikes in the first over, took the wicket of Chris Lynn for 49. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.