-ललित झांबरे
मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएलच्या (IPL) चार सत्रांतील सर्वात पहिली धाव घेणारा फलंदाज ठरला आहे. इतर कोणत्याही फलंदाजाला आयपीएलच्या दोनसुध्दा सत्रात सर्वात पहिली धाव घ्यायची संधी मिळालेली नाही पण रोहित शर्माने २०१५, २०१८, २०२० मध्ये सर्वात पहिली धाव घेतल्यानंतर आता शुक्रवारीसुद्धा आयपीएल २०२१ ची पहिली धाव घेतली आहे.  मोहम्मद सिराजचा पहिलाच चेंडू स्क्वेअर लेगकडे काढत त्याने दोन धावा वसूल केल्या. रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?
आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात सर्वात पहिला चेंडू एकदाच सीमापार झाला आहे आणि तो पराक्रम रोहित शर्माने केला आहे. गेल्यावर्षीच्या सर्वात पहिल्या चेंडूवर त्याने सीएसकेच्या राहुल चाहरला चौकारला लगावला होता. यासह लागोपाठ दोन आयपीएल सत्रात पहिली धाव घेणारासुद्धा तो एकमेव फलंदाज आहे.
आयपीएलमधील पहिली धावा
२०२१- रोहित शर्मा
२०२०-रोहित शर्मा
२०१९- विराट कोहली
२०१७- डेव्हीड वॉर्नर
२०१६-सिमन्स
२०१५- रोहित शर्मा
२०१४-जेकस कॅलीस
२०१३-महेला जयवर्धने
२०१२-फाफ डू प्लेसीस
२०११- एस. अनिरुध्द
२०१०- चेतेश्वर पुजारा
२००९-सनथ जयसुर्या
२००८- ब्रेंडन मॅक्क्युलम