IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी पंजाब किंग्सनं नवा खेळाडू मैदानावर उतरवला!

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वात चारपैकी दोनच सामने जिंकता आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:08 PM2021-04-23T19:08:07+5:302021-04-23T19:10:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Punjab Kings won the toss and decided to bowl first, Know Playing XI | IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी पंजाब किंग्सनं नवा खेळाडू मैदानावर उतरवला!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी पंजाब किंग्सनं नवा खेळाडू मैदानावर उतरवला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४ व्या पर्वात चारपैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात MIच्या फलंदाजांना अपयश आले. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे.  उभय संघांमध्ये २६ सामने झालेत आणि त्यापैकी १४ मुंबई इंडियन्सनं, तर १२ पंजाब किंग्सनं जिंकले आहेत. पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update

मुंबई इंडियन्स ( MI)  आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, फलंदाजी विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गतविजेता MI गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे.   मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना हार मानावी लागली होती आणि त्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारून MIच्या पराभवाचा खड्डा खणला होता. त्या सामन्यातील चुका टाळून मुंबई इंडियन्स आज पंजाबचा ( PBKS) सामना करणार आहे. ( MI Playing XI vs PBKS IPL 2021)  ... तर रोहित शर्मालाच बसावे लागेल संघाबाहेर; सामन्यापूर्वी आली चिंता वाढवणारी बातमी!

पंजाब किंग्स - रवी बिश्नोई IN, मुरुगन अश्विन OUT

पंजाब किंग्स ( Punjab Kings XI) - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, मोईसेज हेन्रीक्स, फॅबियन अॅलन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग (  Punjab Kings: 1 KL Rahul (capt & wk), 2 Mayank Agarwal, 3 Chris Gayle, 4 Deepak Hooda, 5 Nicholas Pooran, 6 Shahrukh Khan, 7 Moises Henriques, 8 Fabian Allen, 9 Mohammed Shami, 10 Ravi Bishnoi, 11 Arshdeep Singh)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians XI) - क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह ( Mumbai Indians: 1 Quinton de Kock (wk), 2 Rohit Sharma (capt), 3 Suryakumar Yadav, 4 Ishan Kishan, 5 Kieron Pollard, 6 Hardik Pandya, 7 Krunal Pandya, 8 Jayant Yadav, 9 Rahul Chahar, 10 Trent Boult, 11 Jasprit Bumrah)  MI Vs PBKS Live Score, IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match

Web Title: IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Punjab Kings won the toss and decided to bowl first, Know Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.