IPL 2021, KKR vs SRH: Manish Pandey became a troll on social media even after 61 runs, this is reason | IPL 2021, KKR vs SRH : ६१ धावांच्या खेळीनंतरही मनीष पांडे सोशल मीडियावर झाला ट्रोल, हे आहे कारण 

IPL 2021, KKR vs SRH : ६१ धावांच्या खेळीनंतरही मनीष पांडे सोशल मीडियावर झाला ट्रोल, हे आहे कारण 

चेन्नई - आयपीएलमध्ये (IPL 2021) रविवारी रात्री झालेल्या लढतीत (KKR vs SRH) सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईटरायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. या लढतीत कोलकात्याने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनीष पांडे (Manish Pandey ) आणि जॉनी बेअस्टोच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर हैदराबादला १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली. दरम्यान, लढतीनंतर ६१ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या मनीष पांडे यांला ट्रोलर्सनी जोरदार ट्रोल केले. (Manish Pandey became a troll on social media even after 61 runs)

दमदार अर्धशतकी खेळीनंतरही मनीष पांडेला ट्रोल झाला. संघाला गरज असताना वेगाने फलंदाजी न केल्याने सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले. १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे दोन गडी १० धावांवरच माघारी परतले होते. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मनीष पांडेने अखेरपर्यंत फलंदाजी केली. एवढेच नाही तर सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र तो संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही. 

हैदराबादच्या संघासाठी मनीष पांडेचा रेकॉर्ड तितकासा चांगला नाही. त्याने केलेल्या आठ अर्धशतकी खेळींवेळी हैदराबादचा पराभव झाला आहे. तर त्याने फटकावलेल्या दोन अर्धशतकांवेळी हैदराबादचा संघ विजयी झाला आहे. हैदराबादच्या विजयामध्ये मनीष पांडेच्या धावांची सरासरी ही केवळ २४ एवढीच आहे.   

सोशल मीडियावर रोहित नावाच्या एका युझरने लिहिले की, केवळ मनीष पांडेच्या जर्सीचा रंगच बदलला आहे. मात्र तो केकेआरच्या विजयासाठीच खेळत आहे. तर प्रतीक नावाच्या अन्य एका युझरने लिहिले की, मनीष पांडेला वाटले की, अंतिम चेंडूवर षटकार मारतो, त्यानंतर कुणी स्टाइक रेटवर प्रश्न उपस्थित करणार नाही. 
 दरम्यान, या सामन्यात सामनावीर ठरलेल्या केकेआरच्या नितीश राणा याने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी होती. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याने ही खेळी त्याच्या स्वर्गीय सासऱ्यांना समर्पित केली. तर राहुल त्रिपाठीने ५३ धावांची खेळी केली.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, KKR vs SRH: Manish Pandey became a troll on social media even after 61 runs, this is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.