IPL 2021: आयपीएलसाठी विंडो मिळणे कठीणच, अडीच हजार कोटींचे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील

IPL 2021 News: आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. त्यात टी-२० विश्वकप स्पर्धेचाही समावेश आहे. प्रत्येक शक्यतेची चाचपणी सुरू असून, त्यात इंग्लंडमध्येही उर्वरित स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:30 AM2021-05-23T05:30:53+5:302021-05-23T05:32:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: It is difficult to get a window for IPL, BCCI tries to avoid loss of Rs 2,500 crore | IPL 2021: आयपीएलसाठी विंडो मिळणे कठीणच, अडीच हजार कोटींचे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील

IPL 2021: आयपीएलसाठी विंडो मिळणे कठीणच, अडीच हजार कोटींचे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर ) 

स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा पूर्ण झाली नाही तर बीसीसीआयचे अडीच हजार कोटींचे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. त्यात टी-२० विश्वकप स्पर्धेचाही समावेश आहे. प्रत्येक शक्यतेची चाचपणी सुरू असून, त्यात इंग्लंडमध्येही उर्वरित स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. (It is difficult to get a window for IPL, BCCI tries to avoid loss of Rs 2,500 crore)

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका व डब्ल्यूटीसी फायनल यादरम्यान ६ आठवड्यांचा कालावधी आहे. यावेळी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाबाबत बीसीसीआय ईसीबीसोबत चर्चा करीत आहे. आथरटनने ब्रेकिंग न्यूज दिल्यानंतर ईसीबीने मात्र बीसीसीआयकडून अद्याप आयपीएलच्या आयोजनाबाबत  अधिकृत विनंती आली नसल्याचे स्पष्ट करताना आयपीएलसाठी विंडो मिळणे कठीण असल्याचे संकेत दिले आहेत.

बीसीसीआयला  विनंती फेटाळली जाण्याची भीती असावी. चर्चेला सुरुवात करून दुसऱ्या बाजूने कसा प्रतिसाद मिळतो याची चाचपणी घेऊन बीसीसीआय सावध पाऊल टाकत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआय व ईसीबीदरम्यान अनौपचारिक चर्चा झालेल्या आहेत.
‘द हंड्रेड’च्या उद्घाटनचा मोसम आहे. यापूर्वी ईसीबीला द हंड्रेडच्या निमित्ताने माघार घ्यावी लागली होती. जोपर्यंत बीसीसीआयसोबतच्या (द हंड्रेडमधील भारतीय खेळाडूंचा सहभाग ब्रँड इक्विटिला चालना देणारा ठरू शकतो) वाटाघाटीतून तोडगा निघत नाही तोपर्यंत ईसीबी आयपीएलबाबतच्या निर्णयात बदल करण्याची शक्यता नाही. 

...तरच खेळाडू उपलब्ध होणार
न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंडमध्येच आहे आणि आयपीएलमध्ये अनेक किवी खेळाडू आहेत. स्पर्धा जर जुलैमध्ये झाली तर ते सहज उपलब्ध राहतील. इंग्लंडचे खेळाडूही स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकत असल्यामुळे अनेक विदेशी खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग राहील. आयपीएलमध्ये बहुसंख्येने असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण बीसीसीआय यावर काही तोडगा काढू शकते.

काय आहे ‘द हंड्रेड’
 ‘द हंड्रेड’ म्हणजे १०० चेंडूंची क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात २१ जुलैपासून होईल. यात आठ संघांचा सहभाग असेल. प्रत्येक संघात एक महिला आणि एक पुरुष संघ असेल. स्पर्धेत स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, राशिद खान, केन विलियम्सन, आंद्रे रसेल असे दिग्गज सहभागी होतील.
 एका सामन्यात २०० चेंडू टाकले जातील. एक षटक दहा चेंडूंचे असेल. दहा चेंडूंनंतर फलंदाज आपापली जागा बदलतील. एक गोलंदाज जास्तीत जास्त २० चेंडू टाकू शकेल. सुरुवातीचे २५ चेंडू ‘पॉवर प्ले’ म्हणून गणले जातील. ‘पॉवर प्ले’ दरम्यान ३० यार्डबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक असतील. स्पर्धेतील लढती इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये रंगणार आहेत.

Web Title: IPL 2021: It is difficult to get a window for IPL, BCCI tries to avoid loss of Rs 2,500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.