IPL 2021, DC vs PBKS T20 Live : लोकेश-मयांकनं दिल्लीला सॉलिड धुतले, पण पंजाबच्या अन्य फलंदाजांनी निराश केले 

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : मागील दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) आज कमाल केली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 09:16 PM2021-04-18T21:16:33+5:302021-04-18T21:17:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 DC vs PBKS Live T20 Score : KL Rahul & M. Agarwal registered highest opening partnership vs DC in IPL, PBKS 4-195  | IPL 2021, DC vs PBKS T20 Live : लोकेश-मयांकनं दिल्लीला सॉलिड धुतले, पण पंजाबच्या अन्य फलंदाजांनी निराश केले 

IPL 2021, DC vs PBKS T20 Live : लोकेश-मयांकनं दिल्लीला सॉलिड धुतले, पण पंजाबच्या अन्य फलंदाजांनी निराश केले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : मागील दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) आज कमाल केली. त्यानं आणि लोकेश राहुल या दोघांनी अर्धशतकी खेळी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि त्यानंतर पंजाब किंग्सच्या ( PBKS) अन्य गोलंदाजांना वाहत्या गंगेत हात धुणे सोपे झाले. लोकेश राहुलच्या वाढदिवसाला मित्रानं दमदार खेळ करून त्याला चांगली भेट दिली. नव्या गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा DCचा डाव फसलेला पाहायला मिळाला.  IPL 2021, DC vs PBKS T20 Live Score Update काल काव्या अन् आज धनश्री!; RCBच्या विजयानंतर युझवेंद्र चहलची पत्नी झाली भावूक, Photo

दिल्ली कॅपिटल्सचा ( DC) कर्णधार रिषभ पंत याचे सर्व डावपेच हाणून पाडताना मयांकनं समोर येईल त्या गोलंदाजाची धुलाई केली. त्यानं २५ चेंडूंत आयपीएलमधील ८वे अर्धशतक पूर्ण केलं. लोकेश राहुलसह त्यानं पहिल्या विकेटसाठी ११३ धावांचा पल्ला पार करून DCविरुद्ध आयपीएलमधील सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नोंदवला. ( KL Rahul and M. Agarwal - 113* is the highest opening partnership vs DC in IPL) विराट कोहलीच्या संघानं बाजी मारली, KKR ना नमवून इतिहासाची नोंद केली


१३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लुकमन मेरिवाला यानं ही भागीदारी तोडली. मयांक ३६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारासह ६९ धावांवर शिखर धवनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. मयांक व लोकेश राहुलनं पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची केलेली भागीदारी ही आयपीएलमधील पंजाब किंग्सकडून सलामीवीरांची पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली. या यादीत लोकेश राहुल/मयांक अग्रवाल ( १८३ वि. राजस्थान रॉयल्स), अॅडम गिलख्रिस्ट/पॉल वॅल्थॅटी ( १३६ वि. डेक्कन चार्जर्स), जे होप्स/शॉन मार्श ( १३३ वि. राजस्थान रॉयल्स) आणि रवी बोपारा/बिस्ला ( १२९ वि. RCB) यांचा क्रमांक येतो.  ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai


लोकेशनंही संयमी खेळ करताना ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.  मार्कस स्टॉयनिसनं ५६ धावांवर खेळणाऱ्या लोकेशचा सोपा झेल सोडला. पण, १६व्या षटकात कागिसो रबाडानं DCला ही महत्त्वाची विकेट्स मिळवून दिली. लोकेश ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. दीपक हुडानं पहिलाच चेंडू सीमापार टोलावून त्याचा इरादा स्पष्ट केला. ख्रिस गेल ( ११) धावांवर माघारी परतला. निकोलस पुरन ( ९) आजही काही खास करू शकला नाही.  पंजाब किंग्सला ४ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. दीपक हुडा २२ (१३ चेंडू) व शाहरुख खान १५ ( ५ चेंडू) धावांवर नाबाद राहिले. 
 

Web Title: IPL 2021 DC vs PBKS Live T20 Score : KL Rahul & M. Agarwal registered highest opening partnership vs DC in IPL, PBKS 4-195 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.