IPL 2021, RCB vs KKR T20 Live : विराट कोहलीच्या संघानं बाजी मारली, KKR ना नमवून इतिहासाची नोंद केली

IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 07:15 PM2021-04-18T19:15:41+5:302021-04-18T19:20:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs KKR T20 Live : For the first time in IPL history, RCB wins its first three games of the season | IPL 2021, RCB vs KKR T20 Live : विराट कोहलीच्या संघानं बाजी मारली, KKR ना नमवून इतिहासाची नोंद केली

IPL 2021, RCB vs KKR T20 Live : विराट कोहलीच्या संघानं बाजी मारली, KKR ना नमवून इतिहासाची नोंद केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. रविवारी झालेल्या पहिल्या डबल हेडर सामन्यात RCBनं कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) दणदणीत विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell)  व एबी डिव्हिलियर्सच्या ( AB de Villiers) फटकेबाजीनं KKRच्या गोलंदाजांना हतबल केले. युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal) फॉर्म परतल्यानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील आनंद आणखी द्विगुणीत झाला. आयपीएलच्या इतिहासात RCBनं प्रथमच पर्वातील सलग तीन सामन्यांत विजय मिळवला. ( This is the first time RCB won the first 3 matches of IPL in the 13 years of league history.) 

शुबमन गिल पुन्हा अपयशी...
दोनशे + लक्ष्याचा पाठलाग करताना KKRला साजेशी सुरुवात करता आली नाही. कायले जेमिन्सननं टाकलेल्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलनं सलग दोन खणखणीत षटकार खेचले, परंतु तिसऱ्या चेंडूवर डॅनिएल ख्रिस्टिननं अप्रतिम झेल घेतला. गिल २१ धावांवर माघारी परतला. नितीश राणा व राहुल त्रिपाठी ही फॉर्मात असलेली जोडी मैदानावर खिंड लढवत होती. पण, वॉशिंग्टन सुंदरनं सहाव्य षटकात KKR ला दूसरा धक्का दिला. राहुल २५ धावांवर माघारी परतला. युझवेंद्र चहलनं आयपीएल २०२१मधील पहिली विकेट घेताना नितीशला ( १८) बाद केले. दिनेश कार्तिकही ( २) युझीच्या फिरकीवर पायचीत झाला. KKRनं १० षटकांत ४ बाद ८३ धावा केल्या होत्या. RCB vs KKR, RCB vs KKR live score Mr. 360ची लव्ह स्टोरी!; 'Taj Mahal' समोर गुडघ्यावर बसून एबी डिव्हिलियर्सन केलं प्रपोज!

 

युझवेंद्र चहलच्या धक्क्यानंतर हर्षल पटेलनं दिला धक्का...
कर्णधार इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन ही जोडी KKRची खिंड लढवत होती. पण, हर्षल पटेलनं २९ धावा करणाऱ्या मॉर्गनला बाद केले. अखेरच्या पाच षटकांत KKRला ८४ धावांची गरज होती. शाकिब व आंद्रे रसेल ही जोडी मैदानावर होती, परंतु सुरूवातीला पडलेल्या विकेट्समुळे त्यांच्यावरील दडपण वाढलेले होते. २०१९मध्ये रसेलनं १३ चेंडूंत नाबाद ४८ धावा कुटताना RCBविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला होता आणि त्याच चमत्काराची त्याच्याकडून अपेक्षा होती. चहलनं टाकलेल्या १७व्या षटकात आंद्रे रसेलनं ( ६,४,४,४,१,१) असा २० धावा चोपल्या. त्यामुळे विराटचा पारा चढलेला पाहायला मिळाला. चहलनं ४ षटकांत ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या. शाकिबनं ( २६) मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. आंद्रे रसेल २० चेंडूंत ३१ धावांत बाद झाला अन् KKRचा पराभव निश्चित झाला. KKRला ८ बाद १६६ धावाच करता आल्या. RCBनं हा सामना ३८ धावांनी जिंकला. RCB vs KKR Live Score, IPL 2021 RCB vs KKR, RCB vs KKR Live Match

वरुन चक्रवर्थीनं पहिल्या षटकात दिले धक्के...
आयपीएलच्या १४व्या पर्वातील पहिल्या डबल हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB ) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) एकमेकांना भीडले. KKRचा गोलंदाज वरुण चक्रवर्थीनं ( Varun Chakravarthi) त्याच्या पहिल्याच षटकात विराट कोहली व रजत पाटिदार यांना माघारी पाठवून RCBची अवस्था २ बाद ९ अशी दयनीय केली. पण, फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं ( Glenn Maxwell) तुफानी फटकेबाजी केली. शाकिब अल हसन व वरुण यांच्या फिरकीवर तोडगा काढताना त्यानं सुरेख रिव्हर्स स्वीप मारले. ( Glenn Maxwell is now the orange cap holder of IPL 2021.) मॅक्सवेलनं २८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. मॅक्सवेल व देवदत्त यांनी ५८ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर देवदत्तनं (२५) लूज शॉट खेळला अन् राहुल त्रिपाठीनं तो सहज झेलला.  IPL 2021 latest news, RCB vs KKR IPL Matches

ग्लेन मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स यांची दमदार फटकेबाजी...
वरुणच्या चौथ्या षटकात मॅक्सवेलनं १७ धावा कुटल्या. त्यामुळे KKRच्या गोलंदाजाला ४ षटकांत ३९ धावा देत २ विकेट्सवर समाधान मानावे लागले. १७व्या षटकात पॅट कमिन्सनं KKRला मोठं यश मिळवून दिलं. ग्लेन मॅक्सवेल ४९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावांवर माघारी परतला. मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स यांनी चौथ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. एबीनं अखेरच्या षटकात दमदार खेळ करताना आयपीएलमधील ३९वे अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहली, रोहित शर्मा व सुरेश रैना यांच्या नावावर प्रत्येकी ३९ अर्धशतकं आहेत. एबीनं ३४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७६ धावा चोपल्या. RCBनं २० षटकांत ४ बाद २०४ धावांचा डोंगर उभा केला. IPL 2021 RCB vs KKR, RCB vs KKR Live Match

Web Title: IPL 2021, RCB vs KKR T20 Live : For the first time in IPL history, RCB wins its first three games of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.