IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या मदतीला भाऊ आला धावून; हैदराबाद संघ व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:28 PM2021-05-03T16:28:50+5:302021-05-03T16:31:02+5:30

IPL 2021, David Warner: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नर सीमारेषेजवळ बसलेला पाहण्यास मिळाले. यामुळे अनेकांसाठी हे दृश्य मन हेलावणारे ठरले.

IPL 2021 David Warners brother Steve slams SRH for axing him from the playing XI | IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या मदतीला भाऊ आला धावून; हैदराबाद संघ व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं!

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या मदतीला भाऊ आला धावून; हैदराबाद संघ व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं!

Next

मुंबई : सनरायझर्स हैदराबादने रविवारी मोठा निर्णय घेताना दिग्गज फलंदाज आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्याकडून संघाचे नेतृत्त्व काढून घेतले. यानंतर नवा कर्णधार म्हणून न्यूझीलंडचा कॅप्टन कूल असलेला केन विलियम्सन याच्याकडे संघाची धुरा सोपविली. इतकेच नाही, तर रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी वॉर्नरला अंतिम संघातही घेतले नव्हते. हैदराबादला या नंतर अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते आणि आता थेट वॉर्नरच्या भावाने हैदराबादला लक्ष्य केल आहे. (IPL 2021 David Warners brother Steve slams SRH for axing him from the playing XI)

IPL 2021: कोरोनानं आयपीएलचं 'बायो-बबल' कसं भेदलं? कारण कळालं, सर्वच झाले हैराण!

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नर सीमारेषेजवळ बसलेला पाहण्यास मिळाले. यामुळे अनेकांसाठी हे दृश्य मन हेलावणारे ठरले. सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहण्यास मिळाले. अनेकवेळा वॉर्नर मैदानात आपल्या संघसहकाऱ्यांसाठी पाणी, हेल्मेट, बॅट आणि टॉवेल घेऊनही गेला. दखल घेण्याची बाब म्हणजे वॉर्नरच्याच नेतृत्त्वात हैदराबादने २०१६ साली आयपीएल चषक उंचावला होता आणि त्याच वॉर्नरवर आलेली ही वेळ पाहून अनेकांना दु:ख झाले.

IPL 2021: कोरोनानं IPLचं बायो-बबल भेदलं! KKR स्पर्धेतून 'आऊट' की आयपीएल स्पर्धाच रद्द?, BCCI पेचात

त्यामुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर हैदराबाद संघाच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. आता वॉर्नरचा भाऊ स्टीव्ह वॉर्नर यानेही हैदराबादला सुनावले आहे. इन्स्टाग्रामवर स्टीव्हने सनरायझर्स हैदराबादला टॅग करत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये २०१४ सालपासून आतापर्यंतची वॉर्नरची शानदार कामगिरी दाखविण्यात आली आहे. यासोबत स्टीव्हने लिहिले की, ‘एक व्यक्ती ज्याने संघाला इतकी वर्षे सांभाळले, तुमच्या सलामी जोडीबाबत संभ्रम नाही. यापेक्षा तुम्ही काही धावा काढणारी शानदार मधली फळी तयार करा.’

IPL 2021: नेटिझन्सनी पकडलं स्पिनर स्टार हरप्रीत ब्रार आणि पॉर्न स्टार यांच्यातील कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

यंदाच्या सत्रात वॉर्नरच्या नेतृत्त्वात हैदराबादने सहा सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामन त्यांना जिंकता आला. त्यामुळे हैदराबाद यंदा गुणतालिकेत तळाला आहे. या निराशाजनक कामगिरीमुळे हैदराबाद संघाने नेतृत्त्वाची धुरा वॉर्नरकडून विलियम्सनकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. मात्र, वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळलेल्या पहिल्याच सामन्यात हैदराबादचा राजस्थानविरुद्ध ५५ धावांनी दारुण पराभव झाला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 David Warners brother Steve slams SRH for axing him from the playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app