IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : In MS Dhoni's 200th game for Chennai Super Kings won by wickets 6 wickets | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीला दोनशेव्या सामन्यात CSKकडून विजयाची भेट; दीपक चहरनं गाजवला दिवस

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीला दोनशेव्या सामन्यात CSKकडून विजयाची भेट; दीपक चहरनं गाजवला दिवस

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना CSKच्या खेळाडूंनी पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्घ एकजुटीनं खेळ केला. दीपक चहरनं ( ४-१३) PBKS च्या तगड्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज देताना पंजाबला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, चेन्नईनं हे लक्ष्य सहज पार केले. फलंदाजांच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या मोईन अलीनं ( Moeen Ali) दुसऱ्या विकेटसाठी फॅफ ड्यू प्लेसिससह ( Faf Du Plessis) दमदार भागीदारी करून चेन्नईचा विजय पक्का केला. Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स

आयपीएलच्या १४व्या पर्वात पहिल्याच सामन्यात २००+ धावा करणाऱ्या पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) तगड्या फलंदाजांनी शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) दीपक चहर ( Deepak Chahar) याच्यासमोर शरणागती पत्करली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवताना PBKSचा कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) धावबाद केलं अन् युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचाही अफलातून झेल टिपला. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) पहिल्या ७ षटकांत चहरकडून चार षटकं फेकून घेतली आणि त्याचा फायदा झाला. पंजाबचा निम्मा संघ पहिल्या सात षटकांत माघारी परतला. PBKSच्या शाहरुख खाननं ( Shahrukh Khan) एकट्यानं कडवी झुंज दिली.  IPL 2021, IPL 2021 latest news, CSK vs PBKS IPL Matches

दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.  IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाजही चाचपडताना दिसले. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर पंजाबचे गोलंदाजही टिच्चून मारा करत होते. ऋतुराज गायकवाड ( ५) पाचव्या षटकात माघारी परतला. अर्षदीप सिंहनं ही विकेट घेतली. त्यानंतर मोईन अलीला प्रमोशन देण्यात आले आणि तोही सावध खेळ करत होता. पण, सेट झाल्यावर त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली. मोईन अली व फॅफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ व अलीनं काही नेत्रदिपक स्ट्रोक खेळले. मोईन ३१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. सुरेश रैना व अंबाती रायुडू झटपट बाद झाले, परंतु त्याचा सामन्याच्या निकालावर काहीच परिणाम झाला नाही. चेन्नईनं१५.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. फॅफ ३३ चेंडूंत ३६ धावांवर नाबाद राहिला. ipl 2021 t20 CSK vs PBKS live match score updates Mumbai

English summary :
First win of the season for CSK as they thump PBKS by six wickets

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : In MS Dhoni's 200th game for Chennai Super Kings won by wickets 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.