मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स व महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ शनिवारी आयपीएलच्या लढतीत ज्यावेळी आमने-सामने असतील त्यावेळी या लढतीचे ‘एक युवा शिष्य व त्याचा गुरू’ असे स्वरुप असेल. दिल्ली संघ यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या सत्रात उपविजेता होता. यावेळी जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे लक्ष्य विजयासह सुरुवात करण्याचे असेल.
तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स गेल्या वर्षी आठ संघांमध्ये सातव्या स्थानी होता. ही निराशाजनक कामगिरी विसरण्यासाठी आयपीएलचा दिग्गज संघ विजयासह सुरुवात करण्यास उत्सुक आहे.
आमने-सामने २३ वेळा
चेन्नई १५ तर दिल्ली ८ वेळा विजयी