Video : MS Dhoni; महेंद्रसिंग धोनीचा पत्नी साक्षीसोबत रोमँटिक डान्स!

MS Dhoni Dance with Sakshi : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कुटुंबीयांना वेळ देत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 09:45 AM2021-02-16T09:45:00+5:302021-02-16T09:45:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: CSK skipper MS Dhoni dazzles with wife Sakshi in ethnic wear, Video | Video : MS Dhoni; महेंद्रसिंग धोनीचा पत्नी साक्षीसोबत रोमँटिक डान्स!

Video : MS Dhoni; महेंद्रसिंग धोनीचा पत्नी साक्षीसोबत रोमँटिक डान्स!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कुटुंबीयांना वेळ देत आहे. क्रिकेटपासून दूर असल्यानं धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूरले आहेत. त्यामुळेच त्यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाची प्रतीक्षा आहे. पण, या चाहत्यांना धोनीची झलक पाहण्याची संधी मिळाली आहे आणि निमित्त ठरलं ते धोनीच्या मित्राच्या लग्नाचे.. धोनीची पत्नी साक्षी हिनं सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याच लग्नसमारंभात धोनीचा रोमँटिक अंदाजही अनेकांना पाहायला मिळाला. IPL 2021 Acution list : २९२ खेळाडू, ६१ जागा अन् आयपीएल फ्रँचायझींकडून १९६.६ कोटींचा पाऊस!

एका रिसेप्शन सोहळ्यात धोनी कुर्ता-पायजमा आणि जॅकेट घातलेला पाहायला मिळाला. धोनीचा हा लूक बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना पाहायला मिळाला. साक्षीही फोटोत सुंदर दिसत आहे.  यावेळी धोनीनं साक्षीसह रोमँटिक डान्स केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ( CSK) साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये ( Mini Auction 2021) धोनीचा संघ कोणत्या खेळाडूला ताफ्यात घेतो याची उत्सुकता आहे.IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!





चेन्नईनं कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन?
चेन्नई सुपर किंग्स - रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन; रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन; २२.९ कोटी शिल्लक - चेन्नईला ६ भारतीय व १ परदेशी खेळाडूची जागा भरायची आहे.

Web Title: IPL 2021: CSK skipper MS Dhoni dazzles with wife Sakshi in ethnic wear, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.