IPL 2021 to begin on April 9 BCCI announces Full Schedule of IPL 2021 | IPL 2021 Schedule: आयपीएलचा रणसंग्राम ९ एप्रिलपासून रंगणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

IPL 2021 Schedule: आयपीएलचा रणसंग्राम ९ एप्रिलपासून रंगणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना चेन्नईत खेळवला जाईल. रोहित शर्माचामुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पहिला सामना रंगेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएल २०२१ साठी सहा स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाईल. 

अहमदाबाद, मुंबईसह, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकात्यात आयपीएलचे सामने रंगणार आहेत. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नुकतीच पिंक बॉल टेस्ट संपन्न झाली. त्याच मैदानावर प्ले-ऑफचे सामने खेळवले जातील. अंतिम सामनादेखील याच मैदानावर होईल. २५ मे, २६ मे आणि २८ मे रोजी प्ले-ऑफचे सामने होतील. तर ३० मे रोजी अंतिम सामना रंगेल. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश नसेल. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असं वृत्त क्रिकबझनं बीसीसीआयच्या हवाल्यानं दिलं आहे. 

आयपीएल २०२१ मध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघ चार स्टेडियमवर सामने खेळेल. एकूण ५६ सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूत प्रत्येकी १० सामने रंगतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी ८ सामने होतील. यंदाच्या आयपीएलमध्ये होम ग्राऊंड नसेल. म्हणजेच कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. सर्व संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. प्रत्येक संघाला ६ स्टेडियमपैकी ४ स्टेडियम्सवर खेळण्याची संधी मिळेल.

पाहा आयपीएल २०२१ चं संपूर्ण वेळापत्रक (IPL 2021 Full Schedule)

आयपीएल २०२१ मध्ये ११ डबल हेडर असतील. म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडे तीन वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरू होतील. गेल्याच वर्षी बीसीसीआयनं यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन केलं होतं. देशात कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यानं आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली गेली. यानंतर आता भारतात सुरक्षितपणे स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 to begin on April 9 BCCI announces Full Schedule of IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.