IPL 2021 :  मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे.c

By स्वदेश घाणेकर | Published: January 28, 2021 03:33 PM2021-01-28T15:33:50+5:302021-01-28T16:22:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: 16-year-old Nagaland spinner Khrievitso Kense invited to Mumbai Indians for trails | IPL 2021 :  मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी

IPL 2021 :  मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी ८ फ्रँचायझींनी १३९ खेळाडूंना कायम ठेवले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले आहे. आता प्रत्येक संघ ऑक्शनची रणनीती आखत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सही ( Mumbai Indians) मागे नाही. लसिथ मलिंगानं ( Lasith Malinga) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे MIनं त्याला रिलीज केले. त्याशिवाय मुंबई इंडियन्सनं  लसिथ मलिंगासह नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख यांनाही रिलीज केले आहे. त्यांच्या पर्समध्ये १५.३५ कोटी शिल्लक आहेत आणि त्यात त्यांना ३ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंची रिक्त जागा भरायची आहे.

मुंबई इंडियन्सनं आयपीएलची सर्वाधिक पाच जेतेपद जिंकली आहेत. २०२१साठीही जेतेपदाच्या निर्धारानं ते मैदानावर उतरणार आहेत. त्यादिशेनं मुंबई इंडियन्स रणनीती आखत आहे. रोहित शर्माच्या संघानं नागालँडच्या १६ वर्षीय गोलंदाज ख्रिएवीत्सो केन्से ( Khrievitso Kense ) याला ट्रायलसाठी मुंबईला बोलावले आहे. नागालँडच्या पहिल्याच खेळाडूला आयपीएल फ्रँचायझीनं ट्रायलसाठी बोलावलं आहे. १६ वर्षीय लेग स्पिनर केन्सेनं सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ( Syed Mushtaq Ali Trophy 2020-21) स्पर्धेतील कामगिरीनं मुंबई इंडियन्सचं लक्ष वेधलं.


१६ वर्षीय खेळाडूनं यंदाच्य सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून नागालँड संघाकडून पदार्पण केलं. त्यानं चार सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. मिझोरामविरुद्ध त्यानं १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नईत सामना खेळताना मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांची त्याच्यावर नजर पडली. त्यानंतर मुंबई इंडियन्सनं त्याला ट्रायलसाठी बोलावले आहे. केन्से आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरल्यास त्याला अनेक संघ घेण्यासाठी उत्सुक असतील. तसे झाल्यास नागालँड क्रिकेटसाठी हा मोठा दिवस असेल. आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करणारा तो पूर्वांचल राज्यातील पहिला खेळाडू ठरेल. 

Web Title: IPL 2021: 16-year-old Nagaland spinner Khrievitso Kense invited to Mumbai Indians for trails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.