IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या

राजस्थान राॕयल्सला पाहिजे तशी चांगली सलामीच मिळूनच नाही राहिली. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या धावसंख्येवर होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 14:22 IST2020-10-20T14:21:31+5:302020-10-20T14:22:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020: Who has lost more wickets in power play ?; Find out | IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या

IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या

- ललित झांबरे 

राजस्थान रॉयल्सचा (RR).संघ खेळतोय चांगलाच पण त्यांना हवे तसे यश मिळत नाहीये. काही ठिकाणी त्यांचे प्रयत्न अपूरे पडत आहेत. या प्रयत्नात प्रामुख्याने समोर येतेय ती बाब ही की, यंदा पॉवर प्लेमध्ये (Power play). ते इतर कोणत्याही संघापेक्षा अधिक विकेट गमावत आहेत. आतापर्यंतच्या 10 सामन्यांमध्ये त्यांनी पाॕवर प्लेमध्ये म्हणजे पहिल्या सहा षटकात 20 विकेट गमावल्या आहेत. याचाच अर्थ राजस्थान राॕयल्सला पाहिजे तशी चांगली सलामीच मिळूनच नाही राहिली. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या धावसंख्येवर होत आहे. 

सोमवारीसुध्दा अबुधाबीत (Abu Dhabi). चेन्नई सुपर किंग्जविरुध्द (CSK) त्यांची पाॕवर प्लेमध्ये 3 बाद 31 अशी नाजूक अवस्था होती. त्यानंतरही त्यांनी पुढे एकही विकेट न गमावता सामना जिंकला कारण पॉवरप्लेमध्ये 2 बाद 43 अशा बऱ्यापैकी सुरुवातीनंतरही चेन्नईच्या संघाला मोठे आव्हान ठेवता आले नाही. 

कदाचित पॉवर प्लेमधील या खराब कामगिरीमुळेच रॉयल्सने जोस बटलरला पाचव्या स्थानी ठेवले असावे कारण सुरुवात खराब झाली तरी स्टिव्ह स्मिथ व जोस बटलर ही अनुभवी फलंदाजांची जोडी त्यांच्याकडे असते. काल नेमका याच जोडीने 98 धावांची भागिदारी करुन त्यांना सामना जिंकून दिला. 

पॉवर प्लेमध्ये सनरायजर्सने सर्वात कमी, आतापर्यंत 9 सामन्यात 7 गडी गमावले आहेत पण म्हणून त्यांची कामगिरी फार चांगली झालेली नाही. सध्या अव्वलस्थानी असलेल्या दिल्लीच्या संघाने 9सामन्यात पाॕवरप्लेमध्ये 14 विकेट गमावल्या आहेत. तळाला असलेल्या चेन्नईने 15 विकेट गमावल्या आहेत.

पॉवर प्लेमध्ये गमावलेल्या विकेट

 

संघ -------------- सामने ---- विकेट

 

राजस्थान --------- 10 ---------- 20

 

चेन्नई --------------- 10 ---------- 15

 

दिल्ली -------------- 9 ------------ 14

 

मुंबई --------------- 9 ------------ 14

 

कोलकाता --------- 9 ------------ 13

 

बंगलोर ------------ 9 ------------- 10

 

किंग्ज ------------- 9 ------------- 8

 

हैदराबाद --------- 9 ------------- 7

Web Title: IPL 2020: Who has lost more wickets in power play ?; Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020