IPL 2020: Sledging against Suryakumar, Virat Kohli Troll on Social Media | IPL 2020 : सूर्यकुमारविरुद्ध स्लेजिंग, कोहली ट्रोल

IPL 2020 : सूर्यकुमारविरुद्ध स्लेजिंग, कोहली ट्रोल

अबूधाबी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार यादव तसाही निराश आहे, पण आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान त्याच्यासोबत कथित स्लेजिंग करीत त्याच्या वेदनेवर मीठ चोळले. कोहलीचे हे वर्तन चाहत्यांना आवडले नाही आणि सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे. लोकांच्या मते कोहली स्टार खेळाडू आहे. सूर्यकुमार यादवसारख्या विशेष प्रकाशझोतात नसलेल्या खेळाडूसोबत त्याने असे वागायला नको होते. 

ही घटना मुंबईच्या डावातील १३ व्या षटकातील आहे.  शेवटच्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने कव्हर ड्राईव्ह लगावला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने चेंडू अडविला. त्यानंतर कोहली व सूर्यकुमार एकमेकांकडून टक लावून बघू लागले. कोहली चेंडूला घाम लावत त्याच्याजवळ पोहोचला. दोघांदरम्यान काही वाद झाला नाही, पण डोळ्यांमध्ये मात्र खुनशी भाव दिसून येत होता. दरम्यान, व्हिडिओमध्ये मात्र वाटते की विराटने सूर्यकुमारला काही म्हटले असावे, पण यादवची प्रतिक्रिया सामान्य होती. त्याने विराटच्या स्लेजिंगला महत्त्व दिले नसल्याचे दिसून येते. 

फटका अडवल्यानंतर सूर्यकुमारने विराट कोहलीकडे नजर का रोखली, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कारण १०वे षटक आहे. त्या षटकात चहलने गोलंदाजी केली होती. षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमारने फटका लगावला आणि विराट कोहलीने सूर मारत चेंडू रोखला आणि सूर्यकुमारकडे फेकला. चेंडू फेकल्यानंतर कोहलीने सूर्यकुमारला कथित प्रकरणी  शिवी दिली. त्यामुळे १३ व्या षटकात सूर्यकुमारने कोहलीकडे डोळे वटारले. दरम्यान, या प्रकरणात सोशल मीडियामध्ये कोहलीची छी..थू.. होत आहे. एका युजरने लिहिले की,‌‘कोहली यादवसोबत डील करण्यास इच्छुक होता. एका अन्य युजरने म्हटले की, विराटने कदाचित यादवला अपशब्द वापरले तर काही युजर्स म्हणतात की, कोहलीला केवळ विदेशी खेळाडूंचा आदर करणे आवडते.

English summary :
Sledging against Suryakumar, Virat Kohli Troll on Social Media

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: Sledging against Suryakumar, Virat Kohli Troll on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.