- रोहित नाईक
आज गतविजेते मुंबई इंडियन्स आपल्या दुसऱ्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) आव्हानाला सामोरे जाणार आहे. केकेआरचा हा यंदाचा पहिलाच सामना असून मुंबई सलामीला झालेल्या पराभवानंतर विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. त्यामुळेच या सामन्यात मुंबईकरांवर दबाव अधिक असेल. ( Live Score & Updates )
Out is Out!, MS Dhoniच्या बचावासाठी साक्षीची बॅटिंग, तिसऱ्या अम्पायरवर टीका
महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?
या सामन्यात प्रत्येक मुंबईकर मोठ्या जोशाने ‘हिटमॅन्स आर्मी’ला सपोर्ट करण्यास सज्ज असेल. मात्र खुद्द रोहितचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड हे मात्र, नक्की कोणाला सपोर्ट करायचे या चिंतेत पडले आहेत. कारण एकीकडे त्यांचा आवडता शिष्य रोहित मुंबईचे नेतृत्त्व करणार असून दुसरीकडे, त्यांचा पुत्र सिध्देश लाड पहिल्यांदाच केकेआरकडून खेळणार आहे.
सिध्देशने गेल्याच सत्रात मुंबईकडून आयपीएल पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता. यंदा मात्र केकेआरने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. सध्या केकेआरला चौथ्या आणि सहाव्या स्थानावरील फलंदाजाची चिंता भेडसावत आहे आणि या दोन्ही स्थानासाठी सिध्देशच्या रुपाने त्यांच्याकडे सक्षम पर्याय आहे. रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘एक प्रशिक्षक म्हणून माझ्या दोन्ही शिष्यांनी आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी अशी ईच्छा आहे. पण त्याचवेळी एक वडील म्हणून माझा सपोर्ट सिध्देशलाच असेल. त्याला खूप कमी संधी मिळाल्या आहेत, त्यामुळे आता केकेआरकडून त्याला संधी मिळेल अशी आशा आहे. अंतिम संघात संधी मिळण्याबाबत त्याने आशाही व्यक्त केली आहे. बघूया आता काय होते ते.’
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रोहितच्या फिटनेसवरुन अनेकांनी टीका केली. त्याचे काहीप्रमाणात सुटलेले पोट पाहून अनेकांना धक्का बसला होता. असाच धक्का लाड यांनाही बसला. ते म्हणाले, ‘लॉकडाऊनमध्ये रोहितने आपल्या फिटनेसवर काहीच काम केलेले दिसत नाही. त्याने फिटनेसवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पहिल्या सामन्यात तो नेहमीपेक्षा स्थूल दिसला. त्याची शरीरयष्टी पाहून मलाही आश्चर्यच वाटले.’