दुबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आतपर्यंत प्रभावी कामगिरी करणारे दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) आणि दिल्ली कॅपिटल्स संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची आशा आहे.
आरसीबी व दिल्ली संघांनी चार सामन्यांतून प्रत्येकी तीन विजय मिळवले. आरसीबीचा विराट कोहली व दिल्लीचा श्रेयस अय्यर या लढतीत कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आरसीबीतर्फे युवा देवदत्त पडीक्कलने आतापर्यंत चार सामन्यांत तीन अर्धशतकांसह १७४ धावा केल्या आहेत. कोहलीला सूर गवसल्यामुळे एबी डिव्हिलियर्स व शिवम दुबे यांच्यावरील दडपण कमी होईल.
वेदर रिपोर्ट-
दिवसाचे तापमान ३७ डिग्री राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५१ टक्के व वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट-
प्रथम फलंदाजी करणाºया संघाला लाभ मिळेल, कारण त्यानंतर खेळपट्टी संथ होत जाते. त्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते.
मजबूत बाजू
दिल्ली। श्रेयस अय्यरचे कुशल नेतृत्व. पृथ्वी शॉ शानदार फॉर्मात आहे. मार्कस स्टोइनिस व शिमरोन हेटमायर यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांची उपस्थिती. वेगवान गोलंदाज नॉर्जे सुरुवातीला व डेथ ओव्हर्समध्ये यशस्वी.
आरसीबी। कोहलीला गवसलेला सूर. देवदत्त पडीक्कलची शानदार कामगिरी. इसुरू उदाना व नवदीप सैनीची प्रभावी कामगिरी.
कमजोर बाजू
दिल्ली। सलामीवीर शिखर धवनचा हरवलेला फॉर्म. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गेल्या लढतीत अपयशी.
आरसीबी। फिरकीपटू झम्पा फॉर्ममध्ये नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी कमकुवत.