भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी ‘मंकडिंग’बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारे बाद करण्याच्या पद्धतीला मंकडिंग म्हटल्या जाते, यावर गावसकर यांचा आक्षेप आहे. गावसकर म्हणाले, ज्याने क्रीजच्या पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भारताच्या वीनू मांकड यांनी बाद केले. त्यात त्या फलंदाजाचे नाव का घेतले जात नाही, असा गावसकर यांचा सवाल आहे. गावसकर म्हणाले, ‘अशा प्रकारे बाद करण्यासाठी मांकड यांच्या नावाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. त्या ऐवजी ब्राऊन यांचे नाव द्यायला हवे. कारण चूक बिल ब्राऊन यांची होती, मांकड यांची नाही. त्यामुळे समालोचन करताना मी अश्विनच्या या कृतीला ब्राऊन आऊट म्हटले होते. माझे सर्व भारतीयांना व भारतीय मीडियाला आवाहन आहे की, त्यांनीही असेच करावे.’
क्रिकेटमध्ये नैतिकतेचा मुद्दा का उपस्थित करण्यात येतो, याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, ‘असे तथाकथित स्पिरिट आॅफ क्रिकेटमुळे आहे. मैदानावर आॅस्ट्रेलियन खेळाडू कधीच मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत, असे म्हटल्या जाते, पण तो भ्रम आहे. जर एखादा खेळाडू अतिरिक्त लाभ घेण्यासाठी चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजच्या पुढे येत असेल तर त्याला बाद करणे खिलाडूवृत्तीच्या विरोधात कसे असू शकते.’