चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील Play Offमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अजून चुरस रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के मानले जात आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 20, 2020 05:27 PM2020-10-20T17:27:18+5:302020-10-20T17:32:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 playoffs qualification scenario: What do CSK, KXIP, RR, SRH need to finish in top 4? | चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?

चेन्नई सुपर किंग्स बनले परावलंबी!; IPL 2020 Play Off चं चौथं तिकीट कोण अन् कसं पटकावणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील Play Offमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अजून चुरस रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के मानले जात आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) १४ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन विजय मिळवून स्पर्धेतील चुरस अधिक रंजक बनवली आहे. चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) सोमवारी सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या उंबरठ्यावरच आहेत. पण, त्यांना अजूनही संधी आहे, परंतु एक पराभव आणि त्यांची Exit पक्की... CSKला पराभूत करून राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) पाचव्या स्थानी झेप घेतली आहे आणि त्यांच्या खात्यात ८ गुण जमा झाले आहेत.

  

चेन्नई सुपर किंग्स  ( CSK) - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK साठी यंदाचे वर्ष हे अत्यंत निराशाजनक म्हणावे लागेल. १० पैकी ७ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि IPL इतिहासात प्रथमच ते गुणतक्त्यात तळाला गेले आहेत. आयपीएलच्या प्रत्येक पर्वात किमान प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ म्हणून CSK ओळखला जातो, परंतु यंदा तोही विक्रम तुटण्याची शक्यता आहे. आता त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकण्यासोबतच चौथ्या स्थानाच्या शर्यतीत असलेल्या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. त्यामुळे चेन्नईला आता परावलंबी रहावे लागेल.

किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) - CSKप्रमाणे पंजाबची परिस्थिती सारखीच आहे. पण, लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबनं परतीच्या सामन्यांत धक्का देण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन्ही सामने त्यांनी जिंकून स्वतःला स्पर्धेत कायम ठेवले आहे. त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात काही हातचे सामने गमावले आहेत आणि आता त्याचा फटका त्यांना बसत आहे. ९ सामन्यांत त्यांनी ६ पराभव पत्करले आहेत. उर्वरित पाच सामने जिंकून ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात.  

सनरायझर्स हैदराबाद ( SRH) - डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणारा हैदराबाद संघाच्या खात्यातही ९ सामन्यांती ६ गुण आहेत आणि त्यांनाही पाचही सामने जिंकावे लागतील. ते एक पराभव पचवू शकतील, कारण १४ गुणांसह नेट रनरेटच्या जोरावर त्यांना चौथ्या स्थानासाठी संधी मिळू शकते. 

राजस्थान रॉयल्स ( RR) - गुणतक्त्यातील तळावरील चार संघांमध्ये सर्वात सुरक्षित संघ हाच आहे. १० सामन्यांत त्यांच्या खात्यात ८ गुण जमा झाले आहेत. सध्या ते पाचव्या स्थानावर आहेत आणि त्यांना SRH व KXIPविरुद्ध खेळायचे आहे. या दोघांनाही नमवून त्यांना बाद करण्याची संधी राजस्थानकडे आहे. चार पैकी त्यांना किमान तीन सामने जिंकावे लागतील.

 

Web Title: IPL 2020 playoffs qualification scenario: What do CSK, KXIP, RR, SRH need to finish in top 4?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.