IPL 2020 MI vs CSK Latest News :  Excellent come back from CSK bowlers, Mumbai Indians post 162/9 against Chennai Super Kings | IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचे दमदार कमबॅक, मुंबईच्या धावांवर लगाम

IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचे दमदार कमबॅक, मुंबईच्या धावांवर लगाम

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिल्या चार षटकांत सामना MIच्या पारड्यात होता, पण पाचव्या षटकात दोन्ही सलामीवीर परतले. त्यानंतर सौरभ तिवारीनं खिंड लढवली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी केली. पण, पुन्हा CSKनं सामन्यात कमबॅक केले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. ( IPL 2020 Live Updates, Click here

फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं. इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. ( IPL 2020 Live Updates, Click here

IPLच्या 12 पर्वात जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं

पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला. ( IPL 2020 Live Updates, Click here

महेंद्रसिंग धोनीला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहून पत्नी साक्षीची रोमँटिक पोस्ट

दीपक चहरची अनोखी 'हॅटट्रिक'; IPLमध्ये असा पराक्रम कुणाला जमला नाही

हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर उतरला. त्याने सुरुवातीला फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने सौरभ तिवारी फटकेबाजी करत होता. पण, 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf  du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या. MIच्या 15 षटकांत 5 बा 126 धावा झाल्या होत्या.  

कृणाल पांड्या ( Krunal Pandya) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हे मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. पण, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही. जेम्स पॅटिन्सनही ( 11) लगेच बाद झाला. मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.

English summary :
Excellent come back from CSK bowlers, Mumbai Indians post 162/9 against Chennai Super Kings

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News :  Excellent come back from CSK bowlers, Mumbai Indians post 162/9 against Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.