दुबई: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2020) पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) काल पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईन कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव करत गुणतालिकेत थेट पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईनं कोलकात्याचा ४९ धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवची फटकेबाजी आणि सर्वच गोलंदाजांची अचूक कामगिरी मुंबईच्या विजयाचं वैशिष्ट्यं ठरली.
या सामन्यात हार्दिक पांड्या हिट विकेट झाला. १९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो थोडा मागे सरकला. या दरम्यान त्याची बॅट यष्ट्यांना लागली. त्यामुळे बेल्स पडल्या. हिट विकेट झाल्यानं पांड्याला माघारी परतावं लागलं. त्यानं १३ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. पांड्यानं त्याच्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार ठोकला.
...अन् मैदानातच बुमराहवर भडकला पांड्या; बघा नेमका काय प्रकार घडला
हार्दिक पांड्या हिट विकेट होताच सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस पडला. याला म्हणतात आत्मनिर्भर. गोलंदाजाला आपली विकेट गिफ्ट करायची, अशा शब्दांत काहींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. काहींना तर थेट गेल्या वर्षाच्या सुरुवातीला घडलेली एक वादळी घटना आठवली. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल 'कॉफी विथ करन' कार्यक्रमात गेले होते. त्या कार्यक्रमात हार्दिकनं केलेली काही विधानं वादग्रस्त ठरली. त्यामुळे मोठं वादळ आलं. काल हार्दिक हिट विकेट होताच अनेकांना 'कॉफी विथ करन'मधील वादग्रस्त वक्तव्यं आठवली. त्या विधानांचा संदर्भ देत अनेकांनी 'हिट विकेट होण्याची ही पांड्याची पहिली वेळ नाही. याआधी तो कॉफी शोमध्येही हिट विकेट झालाय', असं म्हणत टोलेबाजी केली.
चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला
आयपीएलमध्ये हार्दिक आतापर्यंत तीनवेळा हिट विकेट झाला आहे. सर्व प्रथम २००८ मध्ये पंजाबविरुद्ध पांड्या हिट विकेट झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पांड्याच अशाच प्रकारे बाद झाला. यानंतर आता पुन्हा एकदा पांड्या हिट विकेट झाला आहे. आयपीएलच्या या मोसमात हिट विकेट होणारा हार्दिक पहिलाच फलंदाज आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत ११ फलंदाज हिट विकेट झाले आहेत.