IPL 2020, CSK vs MI: Chennai Super Kings' big defeat from Mumbai Indians in IPL | IPL 2020, CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जचे मोठ्ठे पराभव मुंबईकडूनच; आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडलं

IPL 2020, CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्जचे मोठ्ठे पराभव मुंबईकडूनच; आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडलं

ललित झांबरे 

आयपीएलमध्ये (IPL)  मुंबई इंडियन्स (MI)  व चेन्नई सुपर किंग्जची (CSK) स्पर्धा नवीन नाही.पण यंदा सीएसकेचा संघ पुरता ढेपाळला असून शुक्रवारी त्यांनी आपला आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव मुंबई इंडियन्सकडूनच स्विकारला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नईच्या संघावर कुणीही एकही विकेट  न गमावता विजय मिळवला आणि तो मान मुंबई इंडियन्सने मिळवला. 

योगायोगाने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्या तीन प्रकारे सामने गमावले जातात (धावांनी, विकेटनी आणि चेंडू राखून), चेन्नई सुपर किंग्जचे ते तीनही सर्वात मोठे पराभव मुंबई इंडियन्सकडूनच आहेत. सीएसकेचा आयपीएलमध्ये धावांनी सर्वात मोठा पराभव 60 धावांनी आहे. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने त्यांना या अंतराने मात दिली होती. एकही गडी न गमावता म्हणजे 10 गड्यांनी विजय शुक्रवार 23 तारखेचा होता. हाच विजय सार्वाधिक चेंडूंचे अंतर राखूनही ठरला. मुंबईने 12.2 षटकांतच सामना जिंकला म्हणजे तब्बल 46 चेंडू शिल्लक असतानाच सीएसकेने हा सामना गमावला.

चेन्नईचे आयपीएलमधील सर्वात मोठे पराभव

धावा- 60 - वि. मुंबई इंडियन्स - 2013

गडी-- 10 - वि. मुंबई इंडियन्स - 2020

चेंडू--- 46 - वि. मुंबई इंडियन्स - 2020 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020, CSK vs MI: Chennai Super Kings' big defeat from Mumbai Indians in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.