पुढील वर्षातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये बरेच बदल पाहण्यास मिळणार आहे. त्यातही 2020च्या मोसमात ‘पॉवर प्लेयर’ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार अशी चर्चा होती, परंतु बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात पॉवर प्लेअरचा मुद्दा चर्चिला गेला. तुर्तास ही संकल्पना स्थानिक क्रिकेटमध्ये राबवण्यात येईल, असे एकमत झाले. त्यामुळे आगामी मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत हा पर्याय वापरला जाईल. यावेळी स्पर्धा कालावधीही वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचे कळते.
बीसीसीआयनं रात्रीच्या सामन्यांना अधिक पसंती दिली असल्यानं लीगचा कालावधी वाढणार आहे. प्रत्येक दिवशी केवळ एकच सामना खेळवला जावा, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे डबल हेडर सामन्यांची संख्या कमी होईल. 2020साठीच्या लिलावाची तारीख ठरली असून 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे.
No ball साठी अतिरिक्त अंपायर
No ball वर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिरिक्त अंपायर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचीही स्थानिक क्रिकेटमध्ये चाचपणी केली जाईल.