IPL 2019: Mumbai Indians’ Yuvraj Singh emulates MS Dhoni's ‘helicopter shot’ – Watch video | IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच युवीनं लगावला हेलिकॉप्टर शॉट्स, पाहा व्हिडीओ

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच युवीनं लगावला हेलिकॉप्टर शॉट्स, पाहा व्हिडीओ

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2019) 12व्या हंगामाला 23 मार्चला सुरूवात होणार आहे. आयपीएलमध्ये गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराज सिंगच्या कामगिरीच्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवीही तितकाच उत्सुक आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलसाठी युवराजही कसून तयारी करत आहे. सोमवारी त्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट्स मारून सर्वांना चकीत केलं. 

धडाकेबाज फलंदाज युवीच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी आयपीएलमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. 2019च्या आयपीएल हंगामात तो मुंबईकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटीच्या मुळ किमतीत चमूत दाखल करून घेतले आहे.  2018मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला आठ सामन्यांत केवळ 65 धावा करता आल्या आणि पंजाबने त्याला करारमुक्त केले. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज असलेल्या युवीनं नेटमध्ये कसून सराव केला. त्यानं मारलेला हेलिकॉप्टर शॉट्स पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. युवीनं प्रथमच हा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झालाही. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये युवीची फटकेबाजी दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी रशीद खान आणि मोहम्मद शहजाद यांनी हेलिकॉप्टर शॉट्सवर हात आजमावले आहे. 

पाहा व्हिडीओ...

मुंबई इंडियन्सही यंदा आपली कामगिरी सुधारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गतवर्षी त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 
मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 
24 मार्च    मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स    मुंबई
28 मार्च    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू
30 मार्च    किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स    मोहाली
3 एप्रिल    मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2019: Mumbai Indians’ Yuvraj Singh emulates MS Dhoni's ‘helicopter shot’ – Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.