IPL 2019 KXIP vs KKR: Kings XI Punjab set 184 runs target to Kolkata Knight Riders | IPL 2019 KXIP vs KKR : पूरण-कुरनची फटकेबाजी, पंजाबच्या 183 धावा 
IPL 2019 KXIP vs KKR : पूरण-कुरनची फटकेबाजी, पंजाबच्या 183 धावा 

मोहाली, आयपीएल 2019 : महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांना अपयश आल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब अडचणीत सापडला होता. मात्र, निकोलस पूरण आणि मयांक अग्रवाल यांनी संघाला सुस्थितीत आणले. त्यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 184 धावांचे आव्हान ठेवले. सॅम कुरन आणि मनदीप सिंग यांनी अखेरच्या षटकात चांगलीच फटकेबाजी केली. कुरनने 23 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने 24 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबसाठी ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी सावध खेळ केला. मात्र, संदीप वॉरियर्सच्या गोलंदाजीवर लोकेशला माघारी परतावे लागले. वॉरियर्सने टाकलेला स्लोवर चेंडूचा अंदाज बांधण्यात राहुल अपयशी ठरला आणि ख्रिस लीनने त्याचा सोपा झेल टिपला. पंजाबला 13 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर वॉरियरने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गेलचा अडथळा दूर केला. शुबमन गिलने सीमारेषेनजीक गेलचा झेल टिपला. गेलला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरण आणि मयांक अग्रवाल यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 


पूरण आणि अग्रवाल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची 69 धावांची भागीदारी नितीश राणाने तोडली. 27 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 48 धावा करणाऱ्या पूरणला त्याने बाद केले. त्यानंतर अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु नरीनने त्याला धावबाद केले. अग्रवाल 26 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मनदीप सिंगने सूत्र हातात घेत पंजाबला समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर रिंकुनं पंजाबच्या सॅम कुरनचा सोपा झेल सोडला. 


13व्या षटकात हॅरी गर्नीने कोलकाताला यश मिळवून दिले. त्याने मनदीपला ( 25) बाद केले. कर्णधार आर अश्विन भोपळा न फोडता माघारी परतला. आंद्रे रसेलने त्याला त्रिफळाचीत केले. अखेरच्या षटकात कुरनने चांगलीच फटकेबाजी केली. त्याने 22 धावा चोपल्या. 

Web Title: IPL 2019 KXIP vs KKR: Kings XI Punjab set 184 runs target to Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.