IPL 2019 : मुंबईकर श्रेयस अय्यरची खिलाडूवृत्ती, पण रिषभ पंतचा हट्टापायी बदलला निर्णय

IPL 2019: सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या 12व्या हंगामातील प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:51 PM2019-05-09T18:51:35+5:302019-05-09T18:53:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Delhi Capital's captain Shreyas Iyer's change decision after Rishabh Pant interval | IPL 2019 : मुंबईकर श्रेयस अय्यरची खिलाडूवृत्ती, पण रिषभ पंतचा हट्टापायी बदलला निर्णय

IPL 2019 : मुंबईकर श्रेयस अय्यरची खिलाडूवृत्ती, पण रिषभ पंतचा हट्टापायी बदलला निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या 12व्या हंगामातील प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात हैदराबादवर दोन विकेट राखून विजय मिळवला. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप फोरमध्ये स्थान पटकावून सर्वांना अनपेक्षित धक्काच दिला. एलिमिनेटर लढतीत हैदराबादचे पारडे जड मानले जात होते, परंतु दिल्लीनं बाजी मारली. या सामन्यात अय्यरने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीनं सर्वांची मनं जिंकली, परंतु रिषभ पंतच्या हट्टापायी अय्यरला त्याच्या या खिलाडूवृत्तीवर ठाम राहता आले नाही.


अय्यरने नाणेफेक जिंकून यजमान हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. हैदराबादने मार्टिन गुप्तील ( 36), मनीष पांडे ( 30), कर्णधार केन विलियम्सन ( 28), विजय शंकर ( 25) आणि मोहम्मद नबी ( 20) यांच्या कामगिरीच्या जोरावर 8 बाद 162 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. त्यांच्या डावातील अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अय्यरच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. किमो पॉलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा दीपक हुडाचा प्रयत्न हुकला आणि चेंडू यष्टिरक्षक रिषभ पंतकडे गेला. तरीही हुडा आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेला आदील रशीद धाव घेण्यासाठी धावले. पंतने चेंडू त्वरित नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने भिरकावला, त्यावेळी गोलंदाज पॉल व हुडा यांच्या टक्कर झाली आणि हुडा खेळपट्टीवर पडला. पंतने केलेला थ्रो यष्टिंचा वेध घेण्यात यशस्वी ठरला. 


पंचांना नक्की निर्णय काय द्यावा हेच सुचेना. तेव्हा दिल्लीचा कर्णधार अय्यरने हुडा नाबाद असल्याचे मत व्यक्त केले. अय्यरच्या या खिलाडूवृत्तीनं सर्वांची वाहवाह मिळवली. दोन्ही पंच चर्चा करत असताना पंत तेथे आला आणि त्याने अय्यरला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. पंतच्या दबावाखाली अय्यरने निर्णय बदलला आणि हुडाला माघारी फिरावे लागले.



पृथ्वी शॉ आणि  रिषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर विजय मिळवला. पृथ्वीने 56 धावांची खेळी साकारत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर पंतने अखेरच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  हैदराबादला 161धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीकडून किमो पॉलने यावेळी तीन विकेट्स मिळवल्या. 

Web Title: IPL 2019: Delhi Capital's captain Shreyas Iyer's change decision after Rishabh Pant interval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.